Nandurbar News : दोन दिवसांत 141 तळीरामांवर गुन्हे दाखल

Crime News
Crime Newsesakal

नंदुरबार : नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहादरम्यान काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात, तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात, अशा मद्यपी वाहन चालविणाऱ्यांविरोधात ३० व ३१ डिसेंबर या दोन दिवसांत विशेष मोहीम राबवून १४१ तळीरामांवर कारवाई करण्यात आली.

वर्षभरात ३५८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली. (In two days 141 cases registered against drunk Penal action against 358 motorists during the year Dhule News)

Crime News
Jalgaon News : नैराश्यातून शिक्षकाची आत्महत्या; राहत्या घरातच घेतला गळफास

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान १४१ वाहनचालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आलेल्या वाहनचालकांचे परवाने (लायसन्स) निलंबित करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात आहे. लवकरच त्यांच्यावर परवाने निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्हा पोलिस दलाकडून जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालविताना आढळलेल्या ३९१ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३५८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Crime News
Jalgaon News : गावठाणापासून 200 मीटर आतील जमिनीस बिनशेतीची गरज नाही : अमन मित्तल

दारू पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांच्या जीवितासदेखील धोकादायक आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, तसेच कोणीही मद्यपान करून वाहन चालवू नये, दारू पिऊन वाहन चालविताना कोणी वाहनधारक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाने निलंबित करण्याची कारवाई भविष्यातही सुरू राहील, असे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

अशी झाली गुन्ह्यांची नोंद

नंदुरबार शहर पोलिस ठाणे- ५, उपनगर पोलिस ठाणे- २३, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे- ८, नवापूर पोलिस ठाणे- १४, विसरवाडी पोलिस ठाणे- १०, धडगाव पोलिस ठाणे- ५, म्हसावद पोलिस ठाणे- ५, सारंगखेडा पोलिस ठाणे- ६, अक्कलकुवा पोलिस ठाणे- ११, तळोदा पोलिस

ठाणे- ८, मोलगी पोलिस ठाणे- ३ व शहर वाहतूक शाखा- २४.

Crime News
Nashik News : थंडी वाढल्याने गहू, हरभरासाठी पोषक वातावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com