शाळेत विज्ञान छंद मंडळाचे उदघाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

खामखेडा (नाशिक ) : भारत महासत्ता होण्यासाठी शाळांमधून बालवैज्ञानिक निर्माण होणे आवश्यक असून त्यासाठी विज्ञानछंद मंडळ हे एक उत्तम व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन विज्ञान छंदमंडळ प्रमुख एन.के. चव्हाण यांनी केले. ते श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल, देवळा येथे विज्ञान छंद मंडळ उदघाटन प्रसंगी बोलत होते.

देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल येथे विज्ञान छंद मंडळ स्थापन करून उपक्रमांचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक डी. ई. आहेर होते. विद्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवला पाहिजे असे मत मुख्याध्यापक आहेर यांनी मांडले.

सुनील आहेर यांनी उपक्रमांबद्दल माहिती दिली तर पर्यवेक्षक ए. के. आहेर यांनी मार्गदर्शन केले. लोकशाही पद्धतीने मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्षपदी प्रसाद ठाकरे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी. उपाध्यक्ष हेमंत बागुल, सचिव शशांक बनकर, सह सचिव कुणाल देवरे, कोषाध्यक्-ष तन्मय संकलेचा, प्रसिद्धी अधिकारी आर्यन देवरे, सहल जय चव्हाण, हस्तलिखित प्रमुख प्रितम आहेर, शालेय प्रदर्शन सिद्धेश थोरात व आरोग्य विभाग साहिल पाटील.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर पगार,वैशाली गावित, विलास गांगुर्डे व विज्ञान शिक्षकांनी प्रयत्न केले .
 
Web Title: The inauguration of the science hobby board at the school