दिवाळीत एसटीवर "लक्ष्मी' रुसली 

st 2.jpg
st 2.jpg

नाशिक : यंदा दिवाळीच्या हंमागात विविध बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) हंगामी दरवाढदेखील केली होती. तरीही गतवर्षीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या उत्पन्नात घट झाली आहे. सुमारे 70 लाखांहून अधिक घट झाली असून, विभागात इतर आगारांच्या तुलनेत नाशिक आगार-1 ने सर्वाधिक उत्पन्न मिळविले आहे. 

गतवर्षाच्या तुलनेत उत्पन्नात सुमारे 73 लाखांची घट 

दिवाळीत नाशिक विभागाला दोन कोटी 21 लाख 87 हजार 929 रुपये उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी याच हंगामात दोन कोटी 94 लाख 19 हजार 182 रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 73 लाखांची घट झाल्याची नोंद आहे. या वर्षी जुने सीबीएस, नवीन सीबीएस यांसह महामार्ग बसस्थानकावरून नियमित बसगाड्यांव्यतिरिक्‍त अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र पुणे, औरंगाबाद, धुळे वगळता अन्य मार्गांवर प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. 

मनमाडकडून आकडेवारी नाही

दिवाळीत नाशिक आगार क्रमांक 1 ला यंदा सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. येवला आगाराचे उत्पन्न नीचांकी आहे. मनमाड आगाराने अद्याप आकडेवारी सादर केलेली नाही. दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर बरेच दिवस उलटले, तरी मनमाडकडून आकडेवारी प्राप्त झाली नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

आगारनिहाय मिळालेले उत्पन्न 

नाशिक-1 -------- 52 लाख 48 हजार 108 
नाशिक-2 -------- 17 लाख 96 हजार 156 
कळवण ----------- 33 लाख 15हजार 847 
सटाणा ------------- 26 लाख 65 हजार 715 
मालेगाव ----------- 18 लाख 13 हजार 982 
सिन्नर--------------- 18 लाख 25 हजार 120 
नांदगाव------------- 11 लाख 81 हजार 955 
लासलगाव----------- 13 लाख 03 हजार 713 
पिंपळगाव------------ 9 लाख 80 हजार 674 
इगतपुरी-------------- 7 लाख 69 हजार 309 
पेठ------------------ 7 लाख 43 हजार 789 
येवला---------------- 5 लाख 43 हजार 561 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com