Dhule News : वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत वाढ; धुळेकर त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Increase in number of patients due to climate change in dhule news

Dhule News : वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत वाढ; धुळेकर त्रस्त

धुळे : शहरासह परिसरात तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण कायम आहे.

आधी उकाडा, नंतर पाऊस, पुन्हा वातावरणात गारवा, अशा बदलत्या वातावरणामुळे निरनिराळ्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. (Increase in number of patients due to climate change in dhule news)

तसेच डासांचा उच्छाद वाढला असून, पावसाळी स्थितीत शहरात ठिकठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे शहरातील उंचसखल भागात पाणी साचले. वादळी वारा आणि पावसामुळे कामानिमित्त बाहेर आलेल्या नागरिकांना फटका बसला.

वादळी वाऱ्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील बहुसंख्य भागातील वीजपुरवठा खंडित होता. सोमवारी ही स्थिती कमीअधिक फारकाने कायम होती. मंगळवारी सकाळपासून पावसाळी वातावरण तयार झाले. दुपारी अडीचनंतर पावसाने हजेरी लावली. काही वेळाने पावसाने विश्रांती घेतली तरी पावसाळी वातावरण कायम होते.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

या कालावधीत अनेक भागांत सतत वीजपुरवठा खंडित होत होता. विशेषतः पेठ भाग, झाशीची राणी पुतळा चौक परिसर, जिजामाता कन्या शाळा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक त्रस्त झाले. धुळे शहरासह जिल्ह्यातील वातावरणात गेल्या आठवड्यापासून बदल झाला आहे.

जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात गहू, हरभरा, मका या पिकांचे नुकसान झाले. शिवाय वातावरणातील बदल आणि पावसामुळे संसर्गजन्य आजार बळावण्यास सुरवात झाली आहे.

टॅग्स :DhuleTemperatureDisease