साइड मिरर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

गेल्या एक-दीड महिन्यापासून शहरातील विविध भागांतून महागड्या चारचाकी वाहनांचे साइड मिरर चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी (ता. २६) गंगापूर रोड येथील संदीप नागेश्‍वर भदाणे, तसेच त्यांच्या मित्राची इनोव्हा क्रिस्टा मुंबई-आग्रा रोडवर पार्क केली असताना, त्यांचे साइड मिरर चोरीस गेले. 

नाशिक : महागड्या वाहनांचे साइड मिरर (आरसे) चोरी करणाऱ्या टोळीचा मुंबई नाका पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ३३ हजारांचा ऐवज जप्त केला. 

साइड मिरर चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या एक-दीड महिन्यापासून शहरातील विविध भागांतून महागड्या चारचाकी वाहनांचे साइड मिरर चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी (ता. २६) गंगापूर रोड येथील संदीप नागेश्‍वर भदाणे, तसेच त्यांच्या मित्राची इनोव्हा क्रिस्टा मुंबई-आग्रा रोडवर पार्क केली असताना, त्यांचे साइड मिरर चोरीस गेले. मुंबई नाका पोलिसांकडून तपास सुरू होता. वसीम शाबीर शेख (वय ३०, रा. अशोका मार्ग), शाहरुख जावेद शेख (२६, रा. रॉयल कॉलनी) हे दोघे वाहनांचे साइड मिरर चोरी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. आर. जाधव, सी. एम. श्रीवंत, पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर, भरत डंबाळे, सचिन करंजे, शिवाजी मुंजाळ, योगेश शेवरे, युवराज गायकवाड, वाघ यांनी कारवाई करत दोघा संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. 

दोघांना अटक, पाच लाखांचा ऐवज जप्त 

पोलिसानी त्यांच्याकडून एक लाख ३३ हजार रुपयांचे साइड मिरर पॅनलसह २७ मिरर, तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात येत असलेले चार लाखांचे चारचाकी वाहन (एमएच 04- डीएन 0271) असा एकूण पाच लाख ३३ हजारांचा ऐवज जप्त केला. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in incidents of side mirror theft in nashik