गिरणा काठावर कांदा लागवडीत वाढ 

दीपक कच्छवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गिरणा नदीचा काठ लाभलेल्या गावांमध्ये काही विहिरींना चांगले पाणी आहे. या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही लागवड नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी निमबटाईवर करीत आहेत. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने बाहेरचे शेतकरी कुटुंबीयांसह या भागात दाखल झालेले दिसून येत आहेत. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गिरणा नदीचा काठ लाभलेल्या गावांमध्ये काही विहिरींना चांगले पाणी आहे. या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही लागवड नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी निमबटाईवर करीत आहेत. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने बाहेरचे शेतकरी कुटुंबीयांसह या भागात दाखल झालेले दिसून येत आहेत. 

काद्यांसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात पावसाभावी कांदा उत्पादकांना यंदा मोठा फटका बसला. सटाणा, नामपूर, कौतिकपाडे, मनमाड, चांदवड, मालेगाव, नांदगाव आदी भागातील शेतकरी त्यामुळे कांदा उत्पादन घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आले आहेत. विशेषतः चाळीसगाव तालुक्‍यातील गिरणा नदी काठच्या गावांमध्ये अनेकांनी निमबटाई तसेच कसवर कांदा लागवड सुरु केली आहे. काहींनी आपापल्या तालुक्‍यातून उन्हाळी कांदां लागवडीसाठी रोपे आणून त्याची लागवड सुरु केली आहे. 

निमबटाईकडे कल 
आतापर्यत या भागात जवळपास शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी आर्थिक व्यवहार करुन कांदा लागवड केलेली आहे. यावर्षी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला मागचा उन्हाळी कांदा बाजारात कमी भाव मिळत असल्याने विकलेला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत. अशी परिस्थिती असतानाही यावर्षी पुन्हा उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. तालुक्‍यात 91 हजार हेक्‍टर क्षेत्र पेरणीलायक असुन त्यातील गिरणा पट्ट्यात तीन हजार हेक्‍टरवर कांदा लागवड होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, ही लागवड करणाऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अधिक आहेत. 

निमबटाईवर दिली तिघांना शेती 
आमची सर्व भाऊ मिळून सत्तर एकराच्यावर बागायती शेती आहे. मजुरांभावी जमिन पडीत ठेवावी लागत होती. यंदा अकरा एकर शेती कांदा लागवडीसाठी नाशिक भागातील तीन शेतकऱ्यांना निमबटाईवर करण्यास दिली आहे. या दुष्काळी परिस्थितीत येणाऱ्या उत्पन्नातून त्यांनाही दोन पैसे मिळेल व मलाही मिळेल. तिन्ही शेतकऱ्यांना उत्पन्न निघेपर्यंत शेतीसाठी लागणारा खर्च मीच पुरवत आहे. 
​- सरदारसिंग राजपूत (जामदा, ता. चाळीसगाव)  

दुष्काळी परिस्थितीमुळे या भागात आलो 
आमच्या भागात यावर्षी पाऊस खूपच कमी झाला आहे. त्यामुळे मका, सोयाबीन, बाजरी ही पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. त्यामुळे आमच्या भागात खुपच वाईट परिस्थिती आहे. पिण्यासाठी पाणी नाही तेव्हा शेतीसाठी येणार कुठून? त्यामुळेच आम्हाला चाळीसगाव तालुक्‍यात कांदा लागवडीसाठी यावे लागले. 
-​ सोपान बिडकर, (कनाडगाव, ता. चांदवड)

उदरनिर्वाहासाठी तरी पैसा मिळेल 
पवसाळी कांद्याची लागवड केल्यानंतर पाहिजे तसा पाऊस न झाल्याने संपूर्ण कांदा पीक उद्‌ध्वस्त झाले. उन्हाळी कांद्याची लागवड करून निदान कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तरी पैसा मिळेल, या आशेने आम्ही चाळीसगाव तालुक्‍यात कांदा लागवडीसाठी आलेलो आहोत.
- विजय लांडे (चांदवड) 

Web Title: increase in onion cropping at Girana area