विशेष गाड्यांमुळे रेल्वेची "दिवाळी' जोरात..महसुलात 'इतक्याने' वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

गेल्या वर्षीच्या तुलनेने रेल्वेच्या महसुलात झालेली ही वाढ सुमारे १८ टक्‍क्‍यांच्या आसपास अधिक आहे. नियमित प्रवासापोटी साधारण साडेदहा ते साडेअकरा लाखांच्या आसपास महसूल मिळाला आहे. मात्र यंदा त्यात वाढ होउन १३ लाख ८७ हजारांपर्यंत रेल्वेचा दिवाळीतील प्रवाशी भाड्यापोटीचा महसूल वाढला आहे. रेल्वेच्या साधारण सहा गाड्या नाशिक रोडच्या  मार्गावरून धावत होत्या. 

नाशिक : मध्य रेल्वेने दिवाळीच्या सुटीत विशेष रेल्वेगाड्यांची सोय केल्याने रेल्वेच्या महसुलात भरघोस वाढ झाली आहे. दिवाळीच्या दोन आठवड्यांत साधारण १८ टक्के महसूल वाढल्याने दिवाळी रेल्वेला पावली असेच चित्र आहे. दिवाळीच्या विशेष रेल्वेगाड्यांमुळे दूर पल्ल्याच्या प्रवासापोटी रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकाला साधारण १३ लाख ८७ हजार ४०५ लाखांचा महसूल मिळाला. तर नियमित रोजच्या सुमारे 48 गाड्यांतील प्रवाशी वाहतुकीपोटी रेल्वेला सुमारे तीन कोटी ५२ लाख नऊ हजार २८५ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

दिवाळीतील प्रवाशी भाड्यापोटीचा महसूल वाढला

गेल्या वर्षीच्या तुलनेने रेल्वेच्या महसुलात झालेली ही वाढ सुमारे १८ टक्‍क्‍यांच्या आसपास अधिक आहे. नियमित प्रवासापोटी साधारण साडेदहा ते साडेअकरा लाखांच्या आसपास महसूल मिळाला आहे. मात्र यंदा त्यात वाढ होउन १३ लाख ८७ हजारांपर्यंत रेल्वेचा दिवाळीतील प्रवाशी भाड्यापोटीचा महसूल वाढला आहे. रेल्वेच्या साधारण सहा गाड्या नाशिक रोडच्या  मार्गावरून धावत होत्या. 

दोन आठवड्यांत महसुलात १८ टक्‍क्‍यांनी अधिक लाभ 
नियमित रेल्वेगाड्यांना दिवाळीच्या सुटीत चांगली गर्दी होती. रोज या मार्गावरून ४८ च्या आसपास रेल्वेगाड्या धावतात. नियमित गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेला तीन कोटी ५२ लाखांचा महसूल मिळाला आहे. त्यातही चांगली वाढ झाली आहे. दिवाळीच्या सुटीतील प्रवासापोटी साधारण दीड महिने आधीच दूर पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले होते. त्यामुळे नियमित गाड्यांचे आरक्षण मिळण्यासाठी मोठ्या रांगा असल्याने मध्य रेल्वेने दिवाळीसाठी विशेष जादा रेल्वेगाड्यांची सोय केली होती. त्यामुळे नियमित प्रवाशांचा प्रतिसाद यंदाच्या दिवाळीत वाढला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in railway revenue Nashik News