बालकलावंतांचा वाढविला आत्मविश्‍वास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नाशिक - सध्याच्या युगात स्वत:ला सादरीकरण करण्याच्या कौशल्यास महत्त्व आले आहे. लहान वयात चिमुकल्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढविण्यासह त्यांच्यातील कलाकाराला उभारी देण्यासाठी बालनाट्य शिबिराला आजपासून सुरवात झाली. "सकाळ-एनआयई', श्री दामोदर प्रॉडक्‍शन व श्री नाट्यचंद्रशालातर्फे दहादिवसीय शिबिरात सहभागी मुला-मुलींना बालनाट्य प्रशिक्षण दिले जाईल. 

जुनी पंडित कॉलनी येथील बालगणेश फाउंडेशनच्या सहभागृहात होत असलेल्या या शिबिरात नाट्य दिग्दर्शक डॉ. प्रशांत वाघ यांचे सहभागींना मार्गदर्शन लाभत आहे. त्यांना दर्शना क्षेमकल्याणी यांचे सहकार्य लाभत आहे. दहादिवसीय बालनाट्य शिबिराच्या आज पहिल्या दिवशी सहभागींनी एकमेकांची ओळख करून घेतली. तसेच नाट्यप्रकाराबद्दलची माहिती डॉ. वाघ यांनी उपस्थितांना करून दिली. शिबिराच्या पुढील भागात संवाद, देहबोली, समयसूचकता, अभिवाचन, नाट्यवाचन, पाठांतर, स्टेज डेअरिंग, नाटकातील बारकावे आदींबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर रंगमंचावर नाटक सादर करण्याची संधीदेखील मिळणार आहे. 

शिबिरात सहभागाची संधी 
आज काही कारणास्तव बालनाट्य शिबिरात जी मुले-मुली सहभागी होऊ शकली नाहीत, त्यांना सहभागी होण्याची अजून एक संधी उपलब्ध असणार आहे. सवलतीच्या दरात नाट्यप्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सायंकाळी सहाला पंडित कॉलनी येथील बालगणेश फाऊंडेशन सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. 

Web Title: Increased childhood confidence