Indian Air Strike : ‘इनपुट’ मिळाले अन्‌ मोहीम फत्ते’

बालाकोट येथील ‘जैशे महंमद’चे हल्ल्यापूर्वीचे प्रशिक्षण केंद्र
बालाकोट येथील ‘जैशे महंमद’चे हल्ल्यापूर्वीचे प्रशिक्षण केंद्र

धुळे - काश्‍मीरमधील पुलवामात भारतीय जवानांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशवासीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती, दहशतवाद्यांच्या या कृत्याला मोदी सरकार कसे प्रत्युत्तर देते, याकडे जगाच्या नजरा लागल्या होत्या. अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रतिहल्ल्याचे नियोजन आखण्यात आले होते. पूर्वनिर्धारित रणनितीनुसार हवाई दलाने अहोरात्र जागून ३६ तासांमध्ये ही मोहीम फत्ते केल्याची माहिती संरक्षणराज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

देशाच्या राजधानीत रविवारीच घडामोडींना वेग आला होता. त्या वेळी नगाव, नवलनगर (ता. धुळे) येथील विकासकामांच्या कार्यक्रमात मंत्री डॉ. भामरे व्यग्र होते. त्यांना तातडीने दिल्लीला बोलविण्यात आले होते. ते विमानाने पहाटे दिल्लीत पोचले. त्यानंतर सोमवारचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्यासह अन्य प्रमुख मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या. कुणाला सुगावाही लागू न देता मंगळवारी पहाटे ‘हवाई हल्ला’ करण्यात आला. यासाठी पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या देखरेखीखाली ‘वॉररूम’ कार्यरत होती. पंतप्रधान रात्रभर जागेच होते, ते या कारवाईचे मिनिटा मिनिटांचे अपडेट घेत होते, सर्व वैमानिक सुखरूप परतल्यानंतरच त्यांनी सुटकेचा श्‍वास टाकला. साडेचारच्या सुमारास मोदींनी या मोहिमेतील सहभागी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘मिराज’ला कव्हर दहा विमानांचा
भारतीय वायू सेनेची ही मोहीम फत्ते होताना प्रत्यक्ष बाँब टाकणाऱ्या ‘मिराज’ला कव्हर म्हणून अन्य दहा विमाने तैनात करण्यात आली होती. विशेष म्हणजे फ्रान्सकडून खरेदी केलेल्या ‘मिराज’चे ‘अपग्रेडेशन’ ओझर (जि. नाशिक), बंगळूर येथील विमानांच्या कारखान्यात होते, अशी माहिती खास सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com