अनुकंपाचे वारस वाऱ्यावर; निवृत्त मात्र कामावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नाशिक - भारत प्रतिभूती मुद्रणालयात मृत व शारीरिकदृष्ट्या अकार्यक्षम कामगारांचे वारस प्रेसमध्ये नोकरी मिळावी यासाठी एका बाजूला प्रतीक्षा यादीवर आहेत, तर दुसरीकडे मात्र प्रेसमधून निवृत्त झालेल्या ६३ निवृत्त कामगारांना पुन्हा कामावर घेतले गेले आहे. प्रेसच्या स्थापनेपासून प्रथमच असा प्रकार घडला आहे.

मृत व शारीरिकदृष्ट्या अकार्यक्षम कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेण्याचा विषय प्रेसमध्ये वादाचा राहिला आहे. ब्रिटिशकाळापासून चालत आलेल्या या प्रथेमुळे आतापर्यंत हजारो वारस अनुकंपा तत्त्वावर प्रेसमध्ये नोकरीला लागले आहेत. केंद्रीय चलन व नाणे निधी विभागाच्या अखत्यातरीत असताना तब्बल दीड हजाराहून आधिक वारसांनी नोकरीवर घेण्यासाठी उपोषण केले होते. मात्र, सरसकट सगळ्यांना ५ टक्केच अनुकंपा तत्त्वावर घेण्याच्या नियमामुळे डावलण्यात आले. पाठोपाठ २००८ मध्ये प्रेसचे स्वतंत्र महामंडळात रूपांतर झाल्यानंतर ही प्रथा अनेक वर्षे बंद झाली. दोन वर्षांपासून पुन्हा अनुकंपा तत्त्वावर वारसांना घेतले जाऊ लागले आहे. 

दोन हजार प्रतीक्षेत
गेल्या १० वर्षांत अनुकंपा तत्त्वावर २ हजारच्या आसपास कामगारांच्या वारसांनी प्रेसकडे नोकरीसाठी अर्ज केलेले असताना या सगळ्यांना डावलून प्रतिभूती मुद्रणालयातील कंट्रोल विभागात प्रशासनाने ५० कामगार आणि १३ निरीक्षक अशा ६३ जागांवर निवृत्तांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे, हे सगळे निवृत्त कर्मचारी पारपत्र, रिझर्व्ह बॅंकेच्या धनादेशांसह गोपनीय कागदपत्रांच्या छपाईचे कामकाज चालणाऱ्या प्रतिभूती मुद्रणालयाच्या कंट्रोल विभागात रुजू झाले आहेत.

Web Title: India Securities Press Work