रोईंग-क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नाशिक : जकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटातून भारतीय संघाने अव्वल स्थान पदकावत सुवर्णपदक काबीज केले. या संघात नाशिकच्या चांदवड तालुक्‍यातील व सध्या लष्कारात असलेल्या रॉईंगपटू दत्तू भोकनळचा समावेश आहे. त्याच्यासमवेत ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग आणि ओम प्रकाश, सुकमीत सिंग या संघाने शर्यत 6:17:13 अशी वेळ नोंदवत सूवर्णपदकावर नाव कोरले. 
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करता आहेत.

या स्पर्धेत रोईंग प्रकारात सिंगल स्कल या गटातून अपयशाला सामोरे गेलेल्या दत्तू भोकनळने क्‍वाडरपल गटातून अपयशाची भरपाई केली आहे. त्याच्यासह त्याच्या सोबतच्या ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग, ओम प्रकाश व सुकमीत सिंग यांनी क्‍वाडरपल गटातून सुवर्णपदक पटाकवले. या स्पर्धेत इंडोनेशियातील वातावरणाचे आव्हान रोईंगपटूंपुढे होते. मात्र त्यावर मात करत भारतीय संघाने भरीव कामगिरी केली आहे. या गटातून यजमान इंडोनेशिया संघाने 6:20:58 अशी वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले आहे. तर थायलॅंडच्या संघाने 6:22:41 सेकंद अशी वेळ नोंदवितांना कांस्यपदक पटकावले आहे. 

नाशिकचा दत्तू भोकनळ हा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होता. सरावातील त्याची कामगिरी पाहता, आशियाई स्पर्धेत दत्तू नक्‍कीच पदक मिळविले, असा विश्‍वास त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्‍त केला होता.

Web Title: India's gold in the Rowing-Quadruple Group