प्रभाग हद्दीवरून धुसफूस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

भाजपचे नगरसेवक सोनवणे, खोडे यांच्यातील दुरावा उघड
संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनाला सुप्रिया खोडेंची अनुपस्थिती

इंदिरानगर - प्रभाग ३० मधील नगरसेवकांनी नागरिकांच्या सुविधेसाठी मेहबूबनगर येथे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन केले खरे, मात्र वडाळा येथील नगरसेविका सुप्रिया खोडे यांच्या अनुपस्थितीमुळे गेले काही दिवस जोरदार चर्चा असलेल्या नगरसेवकांमधील कथित दुराव्यावर आज शिक्कामोर्तब झाले. 

या प्रभागातून सतीश सोनवणे, ॲड. श्‍याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्यासह खोडे येथून निवडून आले आहेत. खोडे यांचे पती माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी या भागाचे यापूर्वी प्रतिनिधित्व केले. निवडणुकीत दाखविलेल्या एकीमुळे मोठ्या फरकाने चौघे निवडून आले होते. मात्र वडाळा भागात कामानिमित्त होणारा एका नगरसेवकाचा जास्तीचा शिरकाव खोडे यांना रुचला नाही. त्यामुळे वादाला सुरवात झाल्याचे पक्षाचे कार्यकर्ते सांगतात. निवडणुकीत या भागाची पूर्ण जबाबदारी जशी खोडे यांनी दिली होती, तसे या भागातील काम करताना त्यांचाच शब्द प्रमाण असावा, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जाणीवपूर्वक येथे कार्यालय उघडले जात आहे, अशी कार्यकर्त्यांची समजूत आहे असे समजते. नेमकी हीच स्थिती खोडे सुरू करत असलेल्या बापू बंगला येथील कार्यालयाबाबत दुसऱ्या बाजूच्या कार्यकर्त्यांची आहे. याच कारणामुळे नगरसेवकांत आलबेल नाही, याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. 

आमदार हिरे यांनी भागात दौरा केला. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्‍नांबाबत कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. या वेळी सचिन कुलकर्णी, सलीम शेख, शकील शहा, जफर शेख, इम्रान शाह, रफीक शेख, फैज खान, डॉ. संदीप पडघण, स्नेहल काळे, शिल्पा देशपांडे आदी उपस्थित होते.

नगरसेविका खोडेंचे मौन
नगरसेवक सोनवणे म्हणाले, की निवडणुकीचे नियोजन आणि प्रत्यक्ष काम यात फरक असतो. प्रत्येक जण या भागातील नागरिकांचा प्रतिनिधी आहे. त्याच अनुषंगाने अनेक जण इतरांशीदेखील संपर्क साधतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी हे कार्यालय सुरू करणे गरजेचे होते. याबाबत खोडे यांनाही कल्पना होती. मात्र त्या बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र दुपारी चारला इंदिरानगर येथील दुसऱ्या कार्यक्रमात सौ. खोडे उपस्थित राहिल्याने या प्रभागातील नगरसेवकांच्या चौकोनातील एक कोन दुरावत असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली. याबाबत खोडे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत त्यांनी मौन पाळत आपली नाराजी उघड केली.

Web Title: indiranagar nashik news confussion on area