रविशंकर मार्गावरील वाइन शॉपला विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

इंदिरानगर - प्रभाग २३ मधील श्री श्री रविशंकर मार्गावर असलेले महाराणी वाइन शॉप बंद करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली. याप्रकरणी ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पुढच्या आठवड्यात नगरसेवक आणि नागरिक भेट घेणार आहेत. या वेळी नगरसेवक सतीश कुलकर्णी, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सिडकोतून स्थलांतरित झालेले हे दुकान महादेव पार्क येथे सुरू झाले. एकाच दिवसात व्यवहार करून रात्रीतून माल भरून हे दुकान आठ दिवसांपूर्वी सुरू केल्याचे नागरिकांनी सांगितले. मद्यपींचा उच्छाद वाढल्यानंतर नाना पाटील, उमा देशपांडे, डॉ. स्नेहा पाटील, मेघा थूल, प्रशांत थूल, सुशीला जाधव, शीतल अढांगळे, वैशाली पटेल, सरिता चौरे, मल्टिडा डिसूझा यांनी मालक आणि ग्राहकांना गुलाबपुष्प देत सलग चार दिवस गांधीगिरी केली. त्यानंतर उपरोक्त नगरसेवकदेखील त्यात सहभागी झाले. मात्र, काही उपयोग झाला नाही. आमदार फरांदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. 

आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली. मात्र, नियमांच्या अधीन राहून तेच याला परवानगी देतात. त्यामुळे दुकान तात्पुरते बंद करण्याचा अधिकार पोलिस आयुक्तांना आहे, असे सांगत पर्याय सुचवला. मात्र, ही ब्याद कायमची हटली पाहिजे, असे महिलांनी सांगितले. यावर आमदार फरांदे यानी थेट मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन पूर्वीप्रमाणे दारू दुकानांसाठी महापालिका आणि स्थानिक नागरिकांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे, संपूर्ण व्यापारी संकुलात दुकान सुरू करणे आणि शहराच्या बाहेर महामार्गावर दुकानासाठी परवानगी देणे या बाबींचा समावेश कायद्यात करावा, यासाठी आग्रह धरणार आहेत. शहरातील इतर ठिकाणी या प्रकारच्या समस्या आहेत. त्यांची एकत्रित कैफियत मांडणार आहे.

Web Title: indiranagar nashik news wine shop oppose on ravishankar road