सावधान..दिवाळीनंतर औद्यौगीक मंदीच्या झळा आणखी तीव्र..

mandi.jpg
mandi.jpg

नाशिक : महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, बॉश.सिएट आदी अनेक मोठय़ा कंपन्यांनी नाशिकमधील आपल्या प्रकल्पांतील उत्पादनात लक्षणीय कपात केली आहे.औद्यौगीक मंदीने कामाचे तास आणी कंत्राटी नंतर कायम कामगार व बडे पगारदार अधिकारीची संख्याही घटण्याची धोक्याची घंटा वाजू लागली आसून त्याची सुरवात दिवाळी पुर्वीच अंबड मधिल सुमो ऑटो व जगदीश इंजिनीअरिंग या कंपनीतुन सुरू झाल्याचे पाहायला मिळाली आहे.दरम्यान उद्योगासाठी उपकरणे, यंत्रसामग्रीसाठी कर्ज घेणारे अनेक उद्योजक दुहेरी कोंडीत सापडले. कर्जाची परतफेड कशी करायची, ही चिंता त्यांना सतावत आहे. मंदीमुळे अनेकांनी खर्चात कपातीचे धोरण स्वीकारले. पहिली कुऱ्हाड कंत्राटी कामगारांवर कोसळली. 

मंदीने कामाचे तास आणी कंत्राटीनंतर कायम कामगारांची संख्या घटण्याची भिती

कायमस्वरूपी कामगारांच्या भत्त्यांना कात्री लागली. दिवाळी नंतरच्या पुढील टप्प्यात अधिक वेतन घेणाऱ्या  अधिकाऱ्यांचा व कायम कामगारांचा क्रमांक लागू शकतो. याची भिती व्यक्त केली जात आहे.विविध प्रकारच्या मालाला घटलेली मागणी, उत्पादन होत नसल्याने थंड पडलेली यंत्रे, त्यामुळे बंद पडत चाललेले कारखाने आणि या सर्वातून उभी राहिलेली भेसूर बेरोजगारी..देशातील इतर राज्यातही विविध शहरांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये मंदीची लक्षणे ठळकपणे दिसू लागली आहेत.

प्रकल्पांतील उत्पादनात लक्षणीय कपात

‘मंदीच्या गडद छायेत’ महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, बॉश.सिएट आदी अनेक मोठय़ा कंपन्यांनी नाशिकमधील आपल्या प्रकल्पांतील उत्पादनात लक्षणीय कपात केली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालणाऱ्या कारखान्यांत एक किंवा फार तर दोन सत्रांत काम सुरू आहे. मोठय़ा उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघू-मध्यम उद्योगांनाही मंदीचा फटका बसला असून, तीन महिन्यांत येथील औद्योगिक क्षेत्रात तब्बल 20 हजार कंत्राटी कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे.

सुमारे सव्वा लाखाहून अधिक कामगार

जिल्ह्य़ात अडीच हजार लहान-मोठे उद्योग असून, त्यामध्ये सुमारे सव्वा लाखाहून अधिक कामगार काम करतात. महागडी वीज, वाढीव करांचा बोजा, यामुळे पिचलेले उद्योग मंदीच्या फेऱ्याने हतबल झाले आहेत. स्थानिक पातळीवर महिंद्र, बॉश, क्रॉम्प्टन, सीएट टायरसारखे मुख्यत्वे वाहन, इलेक्ट्रिकशी संबंधित कारखाने आहेत. सरकारने ‘बीएस चार’ऐवजी ‘बीएस सहा’ प्रकारातील वाहने, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आणि जीएसटीमुळे अडचणीतून मार्गक्रमण करणारा वाहन उद्योग मंदीच्या खाईत लोटला गेला. उत्पादित वाहनांची मागणी घसरली. महिंद्रच्या.मारुती.टाटा आदी कंपन्याची नव्या वाहनांनी खच्चून भरलेली गोदामे त्याचे निदर्शक आहेत. दोन महिन्यांपासून नाशिकमध्येही आठवडय़ांतून दोन दिवस सुट्टी दिली जाते. अनेक विभागांतील काम बंद झाले. बॉश’ने अनेक दिवस उत्पादन बंद केले. बजाज सन्स, एम. जी. इंडस्ट्रीज, क्रॉम्प्टन, सीएट टायर आदी कारखान्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मोठे उद्योग थंडावत असताना त्याची झळ शेकडो लघू उद्योगांना बसत आहे. हजारो कामगारांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले. 

दिवाळीत अनेकांनी धरला गावाचा रस्ता  
शहरात काम नसल्याने अनेकांनी गावचा रस्ता धरला. औद्योगिक क्षेत्रालगतच्या निवासी वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर मिळणारी घरे रिक्त होण्याचे ते कारण आहे.औद्योगिक मंदीची गडद छाया स्थानिक बाजारपेठेवर पडली आहे. कामगार कुटुंबीयांनी खरेदीस हात आखडता घेतला. शहराचे अर्थकारण आक्रसले असून त्याची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.पेट्रोल-डिझेल वाहनांच्या जीएसटीत कपात, डिझेल वाहनांबाबत सुस्पष्ट धोरण असे उपाय झाल्याखेरीज वाहन उद्योगास उभारी मिळणार नसल्याची भावनाही औद्योगिक क्षेत्रातुन व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया

महिंद्रच्या प्रकल्पात वार्षिक १८ हजार वाहनांचे उत्पादन होते. त्यात ४० टक्क्यांनी कपात झाल्याचे उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) आणि महिंद्र कंपनीच्या अधिकाऱ्यांमधील चर्चेतून उघड झाले आहे- शशिकांत जाधव ‘अध्यक्ष, निमा’     

प्रतिक्रिया - बडय़ा उद्योगांकडून मिळणारे काम कमी झाले. आधी केलेल्या कामांची देयके कित्येक महिने मिळत नाहीत. लघू उद्योजकांना आठवडय़ातून दोन दिवस काम बंद ठेवावे लागत असल्याचे अ‍ॅल्युमिनियमवर प्रक्रिया करणारे उद्योजक -  मंगेश पाटनकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com