महागाईच्या झटक्याने सर्वसामन्य जनता बेजार

महागाईच्या झटक्याने सर्वसामन्य जनता बेजार

तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे.

पेट्रोल व डीझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत. तसेच घरातील गृहिणीचे बजेट देखील दर महिन्याला कोलमडत असून गेल्या सहा महिन्यापासून दर महिन्याला घरगुती व व्यावसायिक सिलेंडरचे दर देखील वाढतच जात आहेत. बुधवारी सटाणा शहरात ९१.३४ रुपयाने पेट्रोल तर ७८.८१ रुपयांनी डिझेलची विक्री झाली. मागील पंधरा ते वीस दिवसापासून पेट्रोल व डिझेलचे भाव १० ते २० पैशाने वाढतच आहे.

या भाववाढीमुळे सर्वसामन्य नागरिक अडचणीत आले आहे. त्यातच जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने बळीराजा मात्र चिंतेत सापडला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आनावेश अशी मागणी नागरिक करीत आहे.

शेतकऱ्यांची बिकट अवस्था
दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असून,याचा परिणाम जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरातील वाहतुकीवर पडत असून प्रवासापासून ते शेतीची मशागत, मजुरांची ने-आण,शेतमाल बाजापेठेपार्यंत पाठवण्याच्या खर्चात देखील वाढ होत आहे. त्यातच कांदा, टोमटो, कोबी, फ्लावर, मिरची आदी भाजीपाला पिकाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे त्यामुळे विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाला वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही असे असताना शेतकऱ्याच्या शेती मालाचे दर मात्र दररोज कमी-कमी होतात आणि पेट्रोल डिझेलचे दर मात्र, दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतकरीवर्गातून रोष व्यक्त केला आहे.

सिलेंडरचाही भडका
एकीकडे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरातही सातत्याने वाढ होतआहे. सटाण्यात सध्या ८९६ रुपयेला गँस सिलेंडर मिळत आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हेच सिलेंडर ८३७ रुपयेला मिळत होते तर ऑगस्ट महिन्यात ८०७ रुपयाला मिळत होते मात्र, दर महिन्याला सिलेंडरच्या किमतीमध्ये ४० ते ५० रुपयांनी वाढ होत आहे.

व्हँट आणि सेस कमी झाल्यास ३४ रुपये स्वस्त होऊ शकते पेट्रोल

महराष्ट्र शासनाने पेट्रोलवर २५ टक्के, व्हँट आणि विविध करापोटी ९ रुपये सेस लावला आहे.जर राज्य शासनाने हे दोन कर जरी रद्द  केले तरी पेट्रोलच्या प्रती लिटरमागे ३४ रुपये स्वस्त मिळू शकते.

दर महिन्याला वाढलेले सिलिंडचे दर
महिना         दर
ऑक्टोबर       ८९६
सप्टेंबर        ८३७ 
ऑगस्ट        ८०७

२८ सप्टेंबर पासून वाढलेले पेट्रोल व डिझेलचे दर
दिनांक                पेट्रोल                 डीझेल
२८ सप्टेंबर            ९०.७५                ७७.९७
२९ सप्टेंबर            ९१.१२                ७८.३६
३० सप्टेंबर            ९१.२४                ७८.६६
१ ऑक्टोबर            ९१.३४                ७८.८१
२ ऑक्टोबर            ९१.३४                ७८.८१
३ ऑक्टोबर            ९१.३४                ७८.८१

मी शेतीविषयक मार्केटिंगचे काम करतो दर दिवशी ८० ते १०० किलोमीटर प्रवास दुचाकीने करावा लागतो त्यातच दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरामुळे मिळणाऱ्या पगारातून अर्धा पगार पेट्रोलवर खर्च होतो म्हणून पेट्रोल दरवाढीमुळे मार्केटिंगसाठी फिरणे सुधा दररोजच खर्चिक होत असून शासनाने उपयोजना करणे गरजेचे आहे नाहीतर ही नोकरी देखील न परवडणारी होऊन सुशिक्षित बेरोजगारांची संख्या देखील वाढू शकते.
- बाळासाहेब पवार,युवक

पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे शेती मशागतीपासून ते शेतमाल बाजारापर्यंत नेण्याचा खर्चात वाढ होत असून, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच सध्या पावसाने पाठ फिरवलल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. त्यांमुळे सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत
- दौलत ठाकरे, शेतकरी तळवाडे दिगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com