याच निष्काळजीमुळे जाताएत निष्पापांचे बळी... 

मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

शेतमळ्यात पाण्याची दुर्भिक्ष्यता जाणवल्यानंतर त्यावर तातडीचा उपाय म्हणजे कूपनलिका केली जाते. मालेगाव येथील कसमादेसह चांदवड, नांदगाव, सिन्नर, तसेच जिल्ह्यात सर्वत्र अशा कूपनलिका करण्याचे प्रमाण मोठे आहे. हा पर्याय खर्चिक असला तरी फुललेले पीक जगविणे महत्त्वाचे असते. कित्येक वेळा पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कसमादे भागात जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने कूपनलिका केलेली आढळते. 

नाशिक : पाण्यासाठी खोदलेल्या काही कूपनलिका पाणी नसल्याने वा आटल्याने दुर्लक्षित होतात व कूपनलिका तशाच राहतात. त्या बुजविणे गरजेचे असताना केवळ निष्काळजीमुळे त्या मोकळ्या असतात. अशा कूपनलिका लहानग्यांसाठी धोकेदायक ठरू लागल्याने यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा काही लहानगे जीव आपण गमावून बसू, हे निश्‍चित. 

कसमादे भागात जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे कुपनलिका

शेतमळ्यात पाण्याची दुर्भिक्ष्यता जाणवल्यानंतर त्यावर तातडीचा उपाय म्हणजे कूपनलिका केली जाते. येथील कसमादेसह चांदवड, नांदगाव, सिन्नर, तसेच जिल्ह्यात सर्वत्र अशा कूपनलिका करण्याचे प्रमाण मोठे आहे. हा पर्याय खर्चिक असला तरी फुललेले पीक जगविणे महत्त्वाचे असते. कित्येक वेळा पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कसमादे भागात जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने कूपनलिका केलेली आढळते. 

वेळीच उपाययोजना केल्यास वाचू शकतो जीव 

एकाचे पाणी आटले की दुसरी, असे करत काही शेतकऱ्यांचे तर दहा-दहा, पंधरा-पंधरा कूपनलिका झाल्या आहेत. पाण्याचा अशा पद्धतीने शोध घेत आणि इकडचा क्रसिंग पाइप, मोटार दुसऱ्या कूपनलिकामध्ये टाकत पाण्याची उपलब्धता करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. मात्र असे करीत असताना सोडून दिलेली कूपनलिका मोकळीच राहाते. काहींचे क्रसिंग पाइप काढून घेतल्याने त्यांचा आकार वाढतो. खरेतर हे अशी मोकळी कूपनलिका बुजविणे वा व्यवस्थित पक्के झाकणे गरजेचे असूनही केवळ निष्काळजीपणाने ती उघडी असतात. त्यामुळे अशा धोकेदायक कूपनलिकांमध्ये चिमुकले अनावधानाने पडतात. कळवण तालुक्‍यातील बेज शिवारात नुकतीच अशी घटना घडली. 

Image may contain: coffee cup, drink, plant and outdoor

वापर नसताना बंदिस्त करणे आवश्‍यक 
कूपनलिका करताना सुरवातीला सहा इंची क्रसिंग पाइप टाकण्यासाठी तशा प्रकारची पहार वापरली जाते. तसे पाहता हे अर्धा फूट व्यासाचे खोल होल असते. त्यात जर क्रसिंग पाइप काढला तर याचा व्यास अजून विस्तारतो आणि धोकासुद्धा. त्यामुळे अशा कूपनलिका वापर नसताना बंदिस्त करणे अतिआवश्‍यक आहे. त्या सोडून दिलेल्या कूपनलिकांमध्ये पावसाचे, छताचे वा इतर वाहून जाणारे पाणी सोडल्यास भूजलपातळी वाढून शेजारचे पाण्याचे स्रोत सशक्त होऊ शकतात. 

कुपनलिकांबाबत काळजी घेणे आवश्यक 

ज्या शेतकऱ्यांनी कूपनलिका करून, तसेच उघडे सोडले असतील तर ते तातडीने बुजावावीत किंवा धोकेदायक ठरणार नाहीत अशा तऱ्हेने पक्के झाकण ठेवून बंद करावीत. - उद्धव भामरे, सामाजिक कार्यकर्ते, खुंटेवाडी (ता. देवळा) 
 
पावसाचे वाहून जाणारे पाणी अशा कूपनलिकांमध्ये सोडल्यास भूजलपातळी वाढू शकेल व ते कुणाला धोकेदायकही ठरणार नाहीत. - विष्णू शेवाळे, अध्यक्ष, संघर्ष संस्था रामेश्‍वर (ता. देवळा)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innocent victims lost due to coup Nashik Marathi News

टॉपिकस
Topic Tags: