Dhule News : मनपा दवाखान्यांची महापौरांकडून पाहणी

Dhule News : मनपा दवाखान्यांची महापौरांकडून पाहणी
esakal

धुळे : नवनिर्वाचित महापौर (Mayor) प्रतिभा चौधरी यांनी शुक्रवारी (ता. १७) वीटभट्टी येथील महापालिकेच्या दवाखान्यात अचानक भेट दिली.

दवाखाना उघडण्याची वेळ सकाळी आठची असताना दहापर्यंत तेथे कुलूप असल्याचे निदर्शनास आले. (Inspection of Municipal Hospitals by Mayor dhule news)

याप्रश्‍नी महापौर श्रीमती चौधरी यांनी आरोग्याधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या. या प्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. मसरूर शेख यांनी सांगितले.

महापौर श्रीमती चौधरी यांनी शुक्रवारी (ता. १७) सकाळी वीटभट्टी येथील मनपा दवाखान्याला सकाळी भेट दिली. त्या वेळी तेथे कुलूप असल्याचे त्यांना आढळून आले. काही रुग्ण तेथे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसले होते. यातील काही रुग्णांनी दवाखान्यात खोकल्याचे औषध मिळत नसल्याबद्दल तक्रार केली.

शिवाय डॉक्टर, कर्मचारी दवाखान्यात वेळेवर येत नाहीत, असाही आरोप केला. याबाबत आरोग्याधिकारी शेख यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत स्थितीची माहिती दिली व संबंधितांची याबाबत चौकशी करून कारवाईच्या सूचना दिल्याचे महापौर श्रीमती चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, महापौर श्रीमती चौधरी यांनी प्रभातनगर दवाखान्यालाही भेट दिली.

तेथील दवाखान्यात आलेल्या रुग्णांशीही संवाद साधत तक्रारी जाणून घेतल्या. तसेच दवाखान्यातील डॉक्टर कर्मचाऱ्यांच्याही संवाद साधत त्यांनी रुग्णांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने कामाच्या सूचना दिल्या. नगरसेवक नंदू सोनार, शिवाजीराव चौधरी, सुबोध पाटील, कल्पेश थोरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Dhule News : मनपा दवाखान्यांची महापौरांकडून पाहणी
Dhule News : 17 वर्षांपासून फरारी संशयिताला अटक

संबंधितांना नोटीस देऊ

दरम्यान, वीटभट्टी येथील दवाखाना वेळेत उघडा नसल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. शेख यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णांची संख्या लक्षात घेऊन औषधांची मागणी व त्यानुसार औषधपुरवठा झाला होता.

नंतरच्या काळात रुग्णांचा फ्लो वाढल्याने थोडे नियोजन कोलमडले. मात्र, इतर दवाखान्यातून औषधांची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, नव्याने औषधांची खरेदी करणार आहोत, असेही डॉ. शेख यांनी स्पष्ट केले.

कायमच्या तक्रारी

महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये त्या-त्या भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी जात असतात. मात्र, महापालिकेचे काही दवाखाने निश्‍चित वेळेवर उघडले जात नाहीत. शिवाय सकाळच्या सत्रात डॉक्टर, कर्मचारी लवकर दांडी मारतात, अशा नागरिकांच्या तक्रारी कायम पाहायला मिळतात. दुपारी लंचब्रेक मात्र वेळेवर होतो.

या वेळी तेथील कर्मचारी गेट, दरवाजा बंद करून लंचब्रेकचा दाखला देऊन आलेल्या रुग्णांना माघारी फिरवतात, असेही प्रकार पाहायला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारे महापालिकेचे दवाखाने किमान वेळेवर उघडून, वेळेवर बंद व्हावेत यादृष्टीने प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Dhule News : मनपा दवाखान्यांची महापौरांकडून पाहणी
Dhule News : खासदारांनी पिळले प्रशासनाचे कान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com