"शव दफन नाही दहन करणार आम्ही"...पण हा बदल केलाय कोणी अन् का?

मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

गावाच्या हद्दीत मृतदेह पुरण्यास जागा नसून व इतरही काही कारणे असल्याने हा सामाजिक बदल करण्याबाबत पगार यांनी उपस्थितांना आवाहन केले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. अखेर यावर एकमत होत सर्वांनी हात उंचावत या बदलास संमती दिली.

नाशिक : जिल्ह्यातील बहुतांश भिल्ल समाज मृतदेह दफन करीत असला, तरी त्याच्या मर्यादा लक्षात घेत खुंटेवाडी (ता. देवळा) येथील भिल्ल समाजबांधवांनी मृतदेह दफन न करता दहन (जाळणे) करण्याचा बदल स्वीकारला आहे. 

पुरण्याऐवजी मृतदेहावर जाळून अंत्यसंस्कार 

देवळा येथील भिल्ल वस्तीत शनिवारी (ता. 30) सायंकाळी सभा घेऊन या निर्णयावर हात उंचावून मतदान घेण्यात आले. या सामाजिक बदलाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सरपंच मीना निकम सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. 
उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी या विषयावर मनोगत व्यक्त केले. गावाच्या हद्दीत मृतदेह पुरण्यास जागा नसून व इतरही काही कारणे असल्याने हा सामाजिक बदल करण्याबाबत पगार यांनी उपस्थितांना आवाहन केले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. अखेर यावर एकमत होत सर्वांनी हात उंचावत या बदलास संमती दिली.

Image may contain: one or more people, crowd and outdoor

खुंटेवाडीच्या भिल्ल समाजबांधवांचा निर्णय

शौचालय वापर, कॉंक्रिटीकरण, रस्ता उपलब्धता आदी विषयांवर माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य कारभारी गायकवाड, ठगूबाई पवार, गोविंदा कुवर, सुनंदा सोनवणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ. निंबा भामरे, माजी सरपंच आशाबाई माळी, बारकू जाधव, सुरेश पवार, बाळू पवार, सुधाकर माळी, भीमराव जाधव, अशोक जाधव, जिभाऊ पगारे, बापू थोरात, ज्ञानेश्‍वर भामरे, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. मोठाभाऊ पगार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. 

हेही वाचा > काय मनात आले त्याच्या..की सप्तश्रृंगीच्या शीतकड्यावरून उडी घेतली

श्रद्धा फाउंडेशनतर्फे अंत्यविधी 
मृतदेह जाळण्यासाठी लाकूड व इतर साहित्यांची आवश्‍यकता असते आणि परिस्थितीमुळे ते विकत घेणे शक्‍य होत नसल्याचे महिलांनी सांगितले. त्यावर भिल्ल वस्तीत कुणीही मृत झाल्यास त्याच्या अंत्यविधीचा हा खर्च श्रद्धा फाउंडेशन करेल, याबाबत तुम्ही निश्‍चिंत राहावे, अशी ग्वाही श्रद्धा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी या वेळी दिली.  

हेही वाचा > वडिलांचे दारु, परस्त्रीचा नाद अन् कर्ज..वैतागली होती 'मुले'...शेवटी मुलांनीच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instead of being buried Funeral on the body Nashik Marathi News