विमाधारकांनो! जुने प्लॅन आता बंद...अन्...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

आयुर्विमा महामंडळासह विविध विमा कंपन्यांनी त्यांच्या जुन्या योजना शनिवारपासून बंद केल्या असल्या तरी नव्या योजनांबाबत मात्र काही जाहीर केलेले नाही. त्यामुळे ही उत्सुकता कायम आहे. विमा नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार विमा कंपन्यांनी त्यांचे नियम बदलले आहेत. त्यानुसार विमाविषयक जुने प्लॅन बंद केले आहेत. नवीन 
प्लॅन महाग असतील, असा अंदाज आहे.

नाशिक : विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा) नॉनलिंक विमा पॉलिसीसंदर्भात जुलैला जाहीर केल्यानुसार विमा कंपनीने शनिवारी (ता.30) पासून अनेक जुने प्लॅन बंद केले आहेत. त्यामुळे विमाधारकांना कुठले नवीन प्लॅन येत आहेत, याची उत्सुकता आहे. 

विमाधारकांत प्लॅनविषयी उत्सुकता 

आयुर्विमा महामंडळासह विविध विमा कंपन्यांनी त्यांच्या जुन्या योजना शनिवारपासून बंद केल्या असल्या तरी नव्या योजनांबाबत मात्र काही जाहीर केलेले नाही. त्यामुळे ही उत्सुकता कायम आहे. विमा नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार विमा कंपन्यांनी त्यांचे नियम बदलले आहेत. त्यानुसार विमाविषयक जुने प्लॅन बंद केले आहेत. नवीन 
प्लॅन महाग असतील, असा अंदाज आहे. प्राधिकरणाने विमा कंपन्यांचे प्रीमियम ठराविक टक्के वाढविण्याचे निर्देश दिल्याने ही वाढ होणार असल्याची चर्चा आहे. विमा कंपन्यांच्या स्थानिक कार्यालयापर्यंत मात्र नव्या योजनांविषयी कुठलेही अधिकृत आदेश आलेले नाहीत. 

हेही वाचा > प्रसुतींच्या कळांनी बिथरली होती ती...त्यातच तिला दिसला 'तो'..अन् मग

जुन्यांच्या जागी नवीन विमा पॉलिसी 

नव्या नियमानुसार डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नव्या नियमामुळे विमा संरक्षण देणाऱ्या पॉलिसीच्या प्रीमियम वाढीला मान्यता मिळण्याने कंपन्याकडून विमा पॉलिसी रकमेत साधारणतः 15 ते 20 टक्‍क्‍यापर्यंत विमा पॉलिसी महाग होण्याची शक्‍यता आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत नव्या नियमांत बदल करण्याची सूचना केली. त्यामुळे हे बदल होणार आहेत. त्यावरूनच विमा महागण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.

हेही वाचा > काय मनात आले त्याच्या..की सप्तश्रृंगीच्या शीतकड्यावरून उडी घेतली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurers are curious about the plan Nashik Marathi News