इंटकच्या उपाध्यक्षपदी जयप्रकाश छाजेड

jaiprakash-chhajed
jaiprakash-chhajed

नाशिक - अखिल भारतीय इंटक उपाध्यक्षपदी नाशिकचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांची फेरनिवड झाली. साडेतीन कोटी सभासद असलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय मजदूर ट्रेड युनियन कॉंग्रेस (इंटक) या कामगार संघटनेच्या रायपूरला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात माजी खासदार डॉ. संजीव रेड्डी यांची अध्यक्षपदी, सरचिटणीसपदी राजेंद्र प्रसाद सिंग; तर उपाध्यक्षपदी जयप्रकाश छाजेड यांची फेरनिवड करण्यात आली.

अधिवेशनात केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध नोंदवून आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा ठराव करण्यात आला. या वेळी महाराष्ट्रातून सचिवपदी ए. क्‍यू. जामा, महेंद्र घरत, गोविंदराव मोहिते, एन. एस. पिल्ले, कैलास कदम यांची निवड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com