येवला - विद्या स्कूलला ब्रिटिश कौन्सिलतर्फे इंटरनॅशनल स्कूल अवार्ड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

येवला - भारतातून मोजक्याच शाळांना दिला जाणारा इंटरनॅशनल स्कूल अवार्ड येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलला जाहीर झाला आहे. येत्या डिसेंबरमध्ये इंग्लंड स्थित ब्रिटिश कौन्सिल संस्थेतर्फे चेन्नई येथे होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

शहराजवळ धानोरा शिवारात डॉ. राजेश पटेल यांनी सुरु केलेल्या या शाळेने अल्पावधीतच विद्यार्थी व पालक प्रिय शाळा म्हणून लौकिक मिळवला आहे. विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या या शाळेला यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे.वर्षभर विद्यार्थ्यांकडून सात वेगवेगळे उपक्रम करवून घेतले.

ब्रिटीशकौन्सिलने विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या देशाचा विचार न करता त्यांच्यामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी इतर देशांसोबत सलोखा तयार करण्याची भूमिका घेतली आहे.त्यानुसार विद्या शाळेने इतर देशांमधील विध्यार्थ्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शाळेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधून तेथील शिक्षणप्रणाली समजून घेतली. तसेच संस्कृती परंपरा,अभ्यासाच्या पद्धती व इतर अनेक प्रकारची माहिती मिळाली.वेगवेगळ्या देशातील चलनी नोटा व त्याची जागतिक घडामोडीनुसार बदलणारी किंमत याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

वेगवेगळ्या देशात साजरे केले जाणारे सण,परंपरा,वेशभूषा अभ्यास श्रीलंकेतील एका शाळेतील मुलांसोबत पूर्ण केला. सर्व उपक्रमांचे व्हिडीओ बनविण्यात आले व ते यु ट्यूब वर टाकण्यात आले आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या भारत, अंटार्कटीका, फिनल्यांड, फ्रान्स, यु.के इत्यादी देशातील प्रजातींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला.तसेच वेगवेगळ्या देशात पाणी वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती,दौलताबाद येथील किल्याला भेट,पक्षांबद्दल माहितीसाठी नांदूरमधमेश्वर येथे प्रत्येक्षभेट देवून प्रायोगिक सिद्धांताद्वारे दिले जाणारे शिक्षण यातील फरक स्पष्टपणे यावेळी समजून घेतला.सातही उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका,चार्टसमॉडेल,पॉवर पॉइनट, बनविले होते. या सर्व उपक्रमांचा दीडशे पानी प्रकल्प बनवून ब्रिटीश कौन्सिलला सादर करण्यात आला,कौन्सिलने तो तपासून त्याची प्रशसां केली. सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने शाळेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल व डॉ. संगिता पटेल,मुख्याध्यापिका सौ.शुभांगी शिंदे यांनी शिक्षकांचे व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

“सर्व उपक्रमासाठी शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली व त्याचे फळ त्यांना मिळाले. शिक्षण पद्धती,विज्ञान तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी शाळेच्या काही विद्यार्थ्यांना इतर देशात पाठविण्याचा व इतर देशातील विद्यार्थ्यांना आपल्या देशात आणण्याचा मानस आहे.”
-डॉ.राजेश पटेल,संस्थापक,विद्या एजुकेशन संस्था

Web Title: International School Award by the British Council to Vidya Vidyalaya