भाजप इच्छुकांच्या २९ ला मुलाखती; कार्यकर्त्यांत संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मालेगाव - महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुक उमेदवारांच्या २९ एप्रिलला मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाचे मालेगाव प्रभारी आमदार नरेंद्र पवार व संघटनमंत्री किशोर काळकर यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी ‘सकाळ’ला दिली. युवानेते अद्वय हिरे व महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यातील वाद अजून मिटलेला नाही. यामुळे इच्छुक व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील वाद उफाळून आल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झाला आहे. हिरे व गायकवाड असे दोन गट पडले आहेत. आठवड्यात पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या गायकवाड समर्थकांच्या मेळाव्याकडे हिरे समर्थकांनी पाठ फिरविली होती. दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. हिरे व गायकवाड यांनी इच्छुकांच्या याद्या वरिष्ठांकडे पाठविल्या आहेत. दोघांशीही संपर्क नसलेल्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना साकडे घालत त्यांच्याकडे तिसरी यादी दिली आहे. हिरे व गायकवाड यांच्यात समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी संघटनमंत्री व मालेगाव प्रभारींवर सोपविण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ नेते दोघांशी संपर्क साधून आहेत. पक्षाची कोर कमिटी २९ एप्रिलला इच्छुकांच्या मुलाखती घेईल. पक्षातर्फे सर्व्हे केला जात आहे. मुलाखती व सर्व्हे विचारात घेऊन कमिटी उमेदवार निश्‍चित करेल. ३ किंवा ४ मेस यादी जाहीर होऊ शकेल. हिरे व गायकवाड यांच्यातील वाद व गैरसमज लवकरच दूर होईल. पक्ष एकोपा व एकजुटीने निवडणुकीत उतरेल. निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल, असा दावा श्री. जाधव यांनी केला.

Web Title: Interviews on BJP Attendant on 29th