PHOTO : रोपांना पाणी देताना...पायाखाली साक्षात अकरा हजार वोल्टेजचा मृत्यू होता...अन् मग..

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

मनमाडपासून सुमारे चार किलोमीटरवर असलेल्या वंजारवाडी येथे भाऊसाहेब जाधव (वय 38) आई-वडील, पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलासोबत राहत होते. त्यांच्या शेतात त्यांनी कांद्याची लागवड केली आहे. त्याच्यासह या भागातील इतर शेतातून वीज वितरण कंपनीच्या वीजतारा गेल्या आहेत. सुमारे महिनाभरापूर्वी येथे वीज खांब पडला आहे. त्याच्यावरील तारी जमिनीवर पडलेल्या आहेत. खांब पडल्याची तक्रार शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे केली होती. तक्रार केल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला असेल असे भाऊसाहेबला वाटले.

नाशिक : वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार आणि हलगर्जीमुळे तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना वंजारवाडी येथे शनिवारी (ता. 1) दुपारी घडली. भाऊसाहेब जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मनमाड पोलिस ठाण्यात रविवारी (ता.2) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

अशी घडली घटना....

मनमाडपासून सुमारे चार किलोमीटरवर असलेल्या वंजारवाडी येथे भाऊसाहेब जाधव (वय 38) आई-वडील, पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलासोबत राहत होते. त्यांच्या शेतात त्यांनी कांद्याची लागवड केली आहे. त्याच्यासह या भागातील इतर शेतातून वीज वितरण कंपनीच्या वीजतारा गेल्या आहेत. सुमारे महिनाभरापूर्वी येथे वीज खांब पडला आहे. त्याच्यावरील तारी जमिनीवर पडलेल्या आहेत. खांब पडल्याची तक्रार शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे केली होती. तक्रार केल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला असेल असे समजून भाऊसाहेब शनिवारी दुपारी कांद्याला पाणी देत असताना वीजतारांच्या संपर्कात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती रविवारी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात पाहणी के

 Image may contain: grass, outdoor and nature

वंजारवाडी : शेतात पडलेला विजेचा खांब. 

संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी; मनमाड पोलिसांत नोंद 

11 हजार वोल्टेज असलेली तार जमिनीवर लोंबकळत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी तातडीने वीजपुरवठा खंडित करणे आवश्‍यक होते. मात्र त्यांनी तसे न केल्याने भाऊसाहेब यांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. यास वीज कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला. 

Image may contain: 1 person

मृत भाऊसाहेब जाधव 

बघा > अगडदुम नगारा...सोन्याची जेजुरी...गिरणारेच्या प्रतिजेजुरी गडावर सदानंदाचा येळकोट...

वीज खांब अवघ्या दोन फूट खोल जमिनीत 
घटनास्थळाची पाहणी करता वीज वितरण कंपनीची आणखी एक हलगर्जी दिसून आली. ज्या खांबावरून 11 हजार वोल्टेजच्या तारी गेल्या आहेत, तो खांब जमिनीत चार फुटांपेक्षा अधिक खोल खड्डा करून त्याला कॉंक्रिटने मजबूत करणे आवश्‍यक होते. मात्र तसे न करता वीज वितरण कंपनीने अवघा दोन ते तीन फूट खोल खड्डा करून त्यात खांब लावले आहेत. अगोदरच शेतातील जमीन भुसभुशीत असते, त्यात फक्त दोन ते तीन फूट खड्डे करण्यात आल्यामुळे खांब कसे तरी तग धरतील, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. याच हलगर्जीतून एक खांब पडला आणि त्यात एका कुटुंबाचा कर्ताधर्ता कायमचा गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. 
 

हेही वाचा > वडिलांचे दारु, परस्त्रीचा नाद अन् कर्ज..वैतागली होती 'मुले'...शेवटी मुलांनीच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irresponsible MSEB is the reason of young farmer,s Death Nashik Marathi News