'आयएसडी' परिषदेसाठी चाळीसगावचे दोघे सुपुत्र अमेरिकेला रवाना!

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 23 मे 2018

अमेरिकेला रवाना...
नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे दरवर्षी इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेन्ट परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा 24 ते 27 मे अशा चार दिवसांची परिषद अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे. गौरवाची बाब म्हणज शिरोडे व बाविस्कर हे या परिषदेत सहभागी होत आहेत. यासाठी मंगळवारी(ता. 22) हे दोघेही नाशिकहून अमेरिकेला रवाना झाले. या परिषदेमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जनजागृती केली जाणार असून, त्याचा फायदा ते संस्थेतर्फे स्थानिकांपर्यंत पोचविणार आहेत.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे (एनएसएस) दरवर्षी इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट परिषदेचे(आयएसडीसी) आयोजन केले जाते. यंदा ही परिषद अमेरिकेत 24 मे पासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे चाळीसगावचे सुपुत्र तथा सध्या नाशिक येथे कार्यरत असलेले अविनाश शिरोडे व विजय बाविस्कर हे चार दिवसांच्या या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जनजागृती केली जाणार आहे. 

नॅशनल स्पेस सोसायटी(एनएसएस)  ही संस्था अमेरिकेत सन 1974 मध्ये  स्थापन झाली होती. 'नासा'सारख्या अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मोठमोठ्या नामांकित संस्था, व्यक्ती तसेच सरकारी संस्था या संस्थेच्या सदस्य आहेत. ही संस्था मनुष्य विकास व विद्यार्थ्यांसाठी काम करते. याच संस्थेचे भारतातील पहिले पूर्ण चॅप्टर दोन वर्षांपूर्वी नाशिक येथे स्थापन झाले होते. त्याचे उद्घाटन अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्याहस्ते झाले होते. 

चाळीसगावचे सुपुत्र तथा नाशिक येथे कार्यरत असलेले उंबरखेडे(ता. चाळीसगाव) येथील अविनाश शिरोडे यांनी पूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत(इस्रो) अंतराळ अभियंता म्हणून काम केले आहे. ते या चॅप्टरचे अध्यक्ष आहेत. पिलखोड(ता. चाळीसगाव) येथील अभियंता विजय बाविस्कर हे खजिनदार म्हणून काम पाहात आहेत. 

अमेरिकेला रवाना...
नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे दरवर्षी इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेन्ट परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा 24 ते 27 मे अशा चार दिवसांची परिषद अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे. गौरवाची बाब म्हणज शिरोडे व बाविस्कर हे या परिषदेत सहभागी होत आहेत. यासाठी मंगळवारी(ता. 22) हे दोघेही नाशिकहून अमेरिकेला रवाना झाले. या परिषदेमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जनजागृती केली जाणार असून, त्याचा फायदा ते संस्थेतर्फे स्थानिकांपर्यंत पोचविणार आहेत.

विद्यार्थ्यांना 'चॅप्टर'चा लाभ...
अंतराळ क्षेत्राविषयी अनेक मोठमोठी संशोधने होतात. मात्र, या बाबी सर्वांपर्यंत पोचत नाही. परिणामी आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असूनही देखील या क्षेत्रापासून दूर राहतात. जर या क्षेत्रातील नियमित घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, तर याकडे पाहण्याचा कल बदलेल व ते संशोधन करण्यास पुढे येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम या 'चॅप्टर'मार्फत केले जात आहे.

आवड असणाऱ्यांना सदस्यत्व...
नॅशनल स्पेस सोसायटीकडून अनेक लहान-मोठ्या स्पर्धांचे नेहमी आयोजन केले जाते. त्यात उपग्रह बनवण्यासह बुद्धीला चालना देणाऱ्या स्पर्धांचा समावेश असतो. याशिवाय  रोबोट, चंद्रावर व मंगळावर उतरणार्‍या वाहनांचे डिझाईन, मंगळावरची आणि चंद्रावरची वस्ती, तिथे वसाहत निर्माण करण्यासाठी घरांचे डिझाईन, त्याला लागणारे साहित्य या संशोधनामध्ये विद्यार्थ्यांना भाग घेता येतो. या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवू शकतात. याबरोबर या क्षेत्राची आवड असणाऱ्यांना 'चॅप्टर'चे सदस्यत्व मिळू शकते. हे सर्व काम इंटरनेटवर ऑनलाईन नॅशनल स्पेस सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटवर करता येते.

Web Title: ISD conference in USA