चिमुकल्या इशमचा गुप्तधनासाठी बळी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

टोणगाव (ता. भडगाव) येथील इशमचा (वय ९) अपहरणानंतर खून करून मृतदेह शेतात फेकला होता. इशम ‘पायाळू’ असल्याने त्याला काजळी लावली, की तो सट्ट्याचे आकडे अचूक सांगायचा. त्यामुळे सटोड्यांमध्ये तो परिचित होता. सट्ट्याचा आकडा लागल्यावर त्याचे वडील बब्बू ललन सय्यद (मूळ रा. फेत्तेपूर-उत्तर प्रदेश) यांना काही रक्कम मिळायची. काजळी लावण्याच्या बहाण्यानेच ‘अघोरी’ तांत्रिकांनी नेले आणि दुसऱ्याच दिवशी विपरीत घडले. गुप्तधनासाठी इशमचा खून करून तांत्रिकांनी दोन्ही डोळे काढून व चेहऱ्याची कातडी सोलून तेथून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे.  

जळगाव - टोणगाव (ता. भडगाव) येथील इशमचा (वय ९) अपहरणानंतर खून करून मृतदेह शेतात फेकला होता. इशम ‘पायाळू’ असल्याने त्याला काजळी लावली, की तो सट्ट्याचे आकडे अचूक सांगायचा. त्यामुळे सटोड्यांमध्ये तो परिचित होता. सट्ट्याचा आकडा लागल्यावर त्याचे वडील बब्बू ललन सय्यद (मूळ रा. फेत्तेपूर-उत्तर प्रदेश) यांना काही रक्कम मिळायची. काजळी लावण्याच्या बहाण्यानेच ‘अघोरी’ तांत्रिकांनी नेले आणि दुसऱ्याच दिवशी विपरीत घडले. गुप्तधनासाठी इशमचा खून करून तांत्रिकांनी दोन्ही डोळे काढून व चेहऱ्याची कातडी सोलून तेथून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे.  

बब्बू सय्यद आणि कुटुंबीयांचा ‘हैदराबादी कंगन’ बनविण्यात हातखंडा होता. पत्नी पिंकी, मुलगी स्नेहा, नाहिद हमजा, लहान मुलगा इशम आणि त्याचा भाऊ हे इलियास बेग यांच्या घरात भाड्याने वास्तव्यास होते. इशम नामांकित इंग्रजी शाळेचा विद्यार्थी असल्याने मराठी, इंग्रजी या भाषा अस्खलीतपणे बोलायचा. असे असताना धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी तो बेपत्ता झाला. अर्थात परिचितानेच त्याला नेल्याचे आढळून आले. सायंकाळ झाली, तरी इशम दिसत नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री घरमालक बेग यांच्या सांगण्यावरून पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी (२२ मार्च) इशमचा मृतदेह सापडल्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. दहा दिवस उलटूनही तपास लागत नाही म्हणून इशमच्या आई-वडिलांसह बहिणीने सामूहिक आत्महत्या केल्याने प्रकरण चिघळले. त्यात ‘सुसाइड नोट’मध्ये नाव असल्याने घरमालक बेग, शेख साजिद अन्वर यांना ३१ मार्चला अटक झाली.      

‘पायाळू’मुळेच ‘घात’
पंधरा वर्षांआतील ‘पायाळू’ मुलगा-मुलगी जादूटोणा आणि अघोरी कृत्यासाठी चालतात. पवित्र विद्येद्वारे काजळी लावून एखाद्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळही वर्तविला जातो. जादूटोणा करणारे काजळी लावून इशमकडून सट्ट्याचे आकडे, लॉटरीचे नंबर मिळविण्यासाठी प्रयत्नशील असायचे. तिसरा व जीवघेणा प्रकार अर्थात अघोरी विद्येत ‘गुप्तधन’ शोधण्यासाठी ‘पायाळू’ मुलावर रात्री विशेष पूजा केली जाते. सावज असलेल्या पायाळू मुलाला काजळी लावल्यावर त्याची शुद्ध हरपते, तो तशाच अवस्थेत तांत्रिकाने विचारलेली माहिती सांगतो. त्याच अवस्थेत त्याला अघोरी तांत्रिक शारीरिक वेदना दिली जाते. त्यात सुई टोचणे, कान-हात पिळून त्याला माहिती सांगण्यास प्रवृत्त केले जाते. यातच त्याचा मृत्यू होतो. 

मृत्यूनंतर डोळे, कातडीवरही कृत्य
अघोरी कृत्यात विधीसाठी अनेक वर्षे वाट पाहिल्यावर सर्व सूत्र जुळून येतात. त्याचप्रमाणे या खुनातही अकरा वर्षांनंतर गुरुवारी होळी होती. अघोरी विधीदरम्यान मुलगा हवी ती ठोस माहिती देत नसल्यास त्याला अनन्वीत वेदना देत ठार मारले जाते. नंतर बाहुली बनविण्यासाठी त्याची कातडी आणि डोळे काढले जातात. हाच प्रकार इशमबाबतही घडला.

म्हणूनच निवडले भडगाव
भडगाव हे ऐतिहासिक गाव आहे. जुने लोक घरातच पैसे, दागिने बुजून ठेवत. गावात बांधकाम करताना काहींना पूर्वजांनी साठवलेल्या चीजवस्तू, सोन्या-चांदीचे नाणे मिळालेले आहे. म्हणूनच गुप्तधनाची लालसा बाळगणारा, बुवाबाजीला लीन असलेले काही ‘रिकामचोट’ही येथे आहेत. गावातील एका पुरातन देवस्थानाजवळ एक-दीड टन सोने गाडल्याच्या सुरस कथाही येथे ऐकायला मिळतात. बब्बूचा घरमालक व अटकेतील संशयित बेग हाही बुवाबाजीवाला आहे. अनेक ‘बाबा’ लोकांच्या तो संपर्कात असून टोणगावात त्याचा दबदबा होता. पायाळू मुलगा इशमला काजळी लावून सट्ट्याचे आकडे त्याने मिळविले होते. त्यातूनच चार लाखांचा सट्टा लागल्याने बेगने पैशांसाठी त्याला तगादा लावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Web Title: Ishaam victim of hidden money in jalgaon