राजापूरच्या बँकेतील १७ लाखांचे ४२ धनादेशांना फुटले पाय..!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

येवला : बँकेत जमा केलेले धनादेश साधारणपणे दोन-चार दिवसांत वटणावळ होऊन जमा होतात. मात्र शहरासह तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र याला अपवाद ठरत असून इतर बँकांच्या तुलनेत अतिशय धीम्या गतीने धनादेश वटत आहेत.त्यातच आता तर बँकेच्या ठीसाळ कारभाराचा संतापजनक प्रकार पुढे आला असून राजापूरच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शेतकऱ्यांनी वटनावळीसाठी जमा केलेले ४२ धनादेशच बेपत्ता झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.

येवला : बँकेत जमा केलेले धनादेश साधारणपणे दोन-चार दिवसांत वटणावळ होऊन जमा होतात. मात्र शहरासह तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र याला अपवाद ठरत असून इतर बँकांच्या तुलनेत अतिशय धीम्या गतीने धनादेश वटत आहेत.त्यातच आता तर बँकेच्या ठीसाळ कारभाराचा संतापजनक प्रकार पुढे आला असून राजापूरच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शेतकऱ्यांनी वटनावळीसाठी जमा केलेले ४२ धनादेशच बेपत्ता झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.

राजापूर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असून परिसरातील राष्ट्रीयकृत असलेली एकमेव बँक या परिसरात असल्याने पाच ते सहा गावांतील शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार येथून चालतात.शेतमाल विक्रीसह इतर खाजगी व्यवहारांचे धनादेश देखील शेतकरी व इतर ग्रामस्थ येथेच वटणावळीसाठी जमा करतात. नेहमीप्रमाणे येथे जमा झालेले शेतकर्याचे सुमारे १७ लाखाच्या रकमेचे ४२ धनादेश राजापूर शाखेचे व्यवस्थापक देशमुख यांनी येवला येथील सोमाणी कुरीयरकडे ९ एप्रिल रोजी कुरियर करण्यासाठी दिले.हे टपाल येवल्यातून नाशिक येथील सोमाणी कुरीयरकडे पाठवले गेले होते.

मात्र,सोमाणी कुरीयरने यांनी हे टपाल टिळकरोड येथील सर्व सेवा शाखा बँकेत देण्याएवजी गडकरी चौक येथील बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयात जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मात्र तपास केला असता,या कार्यालयात धनादेशचे टपालच जमा झालेले नसल्याचे सांगितले जात आहे.तर कुरीयरवाले मात्र गडकरी चौक येथील बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयात जमा केल्याची आमच्याकडे पोहच असल्याचे सांगत आहेत.राजापूर येथील कार्यकर्ते लक्ष्मण घुगे यांनी आज राजापूर ते नाशिक असा पाठपुरावा केल्यावर हे वास्तव उघड झाले आहे.राजापूर बँकेच्या कर्मचार्यांनी चौकशी केली असता धनादेशाचे पार्सल कुठेच नसल्याचे सांगण्यात आले असून या धनादेशांना पाय तर फुटले नाही ना..! असा उपरोधिक प्रश्न शेतकरी करू लागले आहे.

याबाबत नाशिकच्या मु्ख्य कार्यालयातील वरिष्ठ शाखा व्यवस्थापक मनोहर शेवाळे यांच्याशी घुगे यांनी संपर्क केला असता माझाकडे मँनेजरने अद्याप तक्रार केली नाही.मात्र हा विषय गंभीर असून धनादेशांचा तपास लवकरच करू असे त्यांनी सांगितले.
१७ लाखाचे धनादेश एक महिन्यापासून गायब झाल्याने शेतकर्यामध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येत असून यामुळे अनेकांचे आर्थिक गणित देखील विस्कळीत झाले आहे.एक शेतमालाचे रोख पैसे मिळत नाही अन त्यात मिळालेले धनादेश जर असे बँकेतून गायब होत असतील तर बँकावर विश्वास ठेवावा कि नाही असे म्हण्याची वेळ आली आहे. आठवड्याच्या आत या बेपत्ता धनादेशांचा तपास लागला नाही तर बँकेसमोर उपोषनाला बसण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

“येवला नाशिक कुरीयर कार्यालयाकडे टपाल कुठे व कसे दिले गेले याचा तपास केला असून जेथे द्यायचे त्या कार्यालयात न दिल्याने हा गोंधळ वाढला आहे.या धनादेशाची शोधाशोध आम्ही करत असून यावर तोडगा देखील काढण्याच्या प्रयत्नात आहे.”
- एजाज देशमुख,शाखा व्यवस्थापक,राजापूर

Web Title: issue related to cheque in rajapur yeola