बंगाळे यांना ‘जिल्हा आदर्श तलाठी’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

जळगाव - राज्यभरात एक मेस आदर्श तलाठी पुरस्कार दिले जातात. यंदाचा जळगाव जिल्ह्याचा आदर्श तलाठी पुरस्कार हिंगोणा (ता. यावल) येथील तलाठी व जळगाव जिल्हा तलाठी संघटनेचे सचिव जे. डी. बंगाळे यांना जाहीर झाला आहे. 

उद्या (ता.१) कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजवंदनानंतर हा पुरस्कार दिला जाईल. धनादेश, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारार्थींच्या निवडीसाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे २६ एप्रिलला बैठक झाली. त्यात ही निवड करण्यात आली.

तलाठी बंगाळे यांनी २००८ मध्ये रावेर तालुक्‍यात तलाठी म्हणून रुजू झाले. २००८-२०११ दरम्यान त्यांनी दसनूर (ता. रावेर) येथे वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविले. २००९, २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात ईव्हीएम’चा प्रचार व पसार केला.

कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. दसनूर येथे राजस्व अभियान अंतर्गत दाखले वाटप केले. २०११ मध्ये महसूल दिनाला उत्कृष्ट तलाठी म्हणून गौरविण्यात आले. २०११-२०१५ काळात सावखेडा बुद्रुक (ता. रावेर) सजेत आम आदमी विमा योजने अंतर्गत उल्लेखनीय काम केले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात लाभार्थ्यांना तातडीने मदत वाटप होण्यासाठी पुढाकार घेतला. २०१५ पासून हिंगोणा येथे कार्यरत आहे. सात-बारा संगणकीकरणात महत्त्वाची भूमिका त्यांनी केली. २०१६ मध्ये पंधरा तालुक्‍यात जाऊन तलाठी, मंडलाधिकारी, नायब तहसीलदार यांना सातबारा संगणकीकरणातील ई फेरफार व एडिट मोड्यूल आज्ञावलीचे प्रशिक्षण दिले.

२०१६ मध्ये जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट तलाठी म्हणून गौरव झाला. २०१७ मध्ये जळगाव, धुळे जिल्ह्यातील ८०० पेक्षा जास्त तलाठी मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांना सातबारा संगणकीकरणातील रिएडीट मोड्यूल आज्ञावलीचे प्रशिक्षण दिले आहे.

Web Title: J. D. bangale District Model Talathi award