75 जागांसाठी 303 उमेदवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

75 जागांसाठी 303 उमेदवार 

जळगाव ः जळगाव महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी 124 उमेदवार घेतली. माघारीच्या निवडणुकीचे चित्रे स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्षात भाजप, शिवसेना आणि आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

75 जागांसाठी 303 उमेदवार 

जळगाव ः जळगाव महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी 124 उमेदवार घेतली. माघारीच्या निवडणुकीचे चित्रे स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्षात भाजप, शिवसेना आणि आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मनपाच्या 19 प्रभागांतून 75 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गेल्या 4 ते 11 जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यात 615 अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत 188 अर्ज बाद ठरले, माघारीची शेवटच्या दिवसापर्यंत 96 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. माघार घेणाऱ्यांमध्ये अपक्षांची संख्या अधिक असल्याने राजकीय पक्षांचे उमेदवार आणि पक्षश्रेष्ठी अपक्षांची मनधरणी करण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. 

अकरा सरळ लढती... 
प्रभाग 1 (ब) ः संगीता दांडेकर (शिवसेना) - सरिता नेरकर (भाजप) 
प्रभाग 4 (ब) ः जयश्री धांडे (शिवसेना) - भारती सोनवणे (भाजप) 
प्रभाग 4 (क) ः चेतना चौधरी (भाजप) - सय्यद सनीम अयाजअली (शिवसेना) 
प्रभाग 7 (अ) ः सीमा भोळे (भाजप) - साधना श्रीश्रीमाळ (शिवसेना) 
प्रभाग 12 (ब) ः उज्वला बेंडाळे (भाजप) - पुष्पा पाटील (शिवसेना) 
प्रभाग 12 (क) ः मंदाकिनी जंगले (शिवसेना) - गायत्री राणे (भाजप) 
प्रभाग 12 (ड) ः जीवन अत्तरदे (भाजप) - अनंत जोशी (शिवसेना) 
प्रभाग 14 (अ) ः रेखा पाटील (भाजप) - कामिनी महाजन (शिवसेना) 
प्रभाग 17 (अ) ः सुचित्रा महाजन (शिवसेना) - मीनाक्षी पाटील (भाजप) 
प्रभाग 17 (क) ः प्रकाशचंद जैन (शिवसेना) - सुनील खडके (भाजप) 
प्रभाग 19 (अ) ः शरिफा तडवी (भाजप) - लता सोनवणे (शिवसेना). 
..... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jagansathi