मोटारसायकल अपघातात जैताणेतील शेतकरी ठार

Jaitane farmers killed in a motorcycle accident
Jaitane farmers killed in a motorcycle accident

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सावता चौकात राहणारे शेतकरी भगवान शामभाऊ सोनवणे (वय : 48) यांचे मंगळवारी (ता.4) रात्री नऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. तर त्यांच्या सोबत असलेले सावता चौकातील रहिवासी जगन माणिक भागवत हे गंभीर जखमी झाले आहेत. तरुण शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी (ता.4) रात्री नऊच्या सुमारास सोनवणे हे भागवत यांच्यासोबत मोटारसायकलीने निजामपूरहून साक्री रस्त्याकडे शेतात जात असताना इंदिरानगर, हनुमान मंदिराशेजारील विटा भट्टीजवळ साक्रीहून नंदुरबारकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या होंडा शाईन कंपनीच्या मोटारसायकलने त्यांना समोरासमोर जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने भगवान सोनवणे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मेंदूत रक्तस्राव झाल्याने व डोक्याला गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी (ता.5) सकाळी नऊच्या सुमारास जैताणे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन ठाकरे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. 

दरम्यान, मयताचे लहान बंधू छोटू शामभाऊ सोनवणे यांनी बुधवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील घटनेचा पुढील तपास करत आहेत. दोन्हीही अपघातग्रस्त मोटारसायकली निजामपूर पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आल्या आहेत.

इतर दोघांपैकीही एक मयत?
साक्रीहून नंदुरबारकडे जाणारे इतर दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांनाही प्रथमोपचार केल्यानंतर त्या रात्रीच पुढील उपचारार्थ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून पुढे त्यांना धुळे येथे हलविण्यात आले असून त्यापैकी एक जण मयत झाल्याचे समजते. त्या दोघांचीही नावे समजू शकली नाहीत. संबंधित दोघेही शहादा तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com