जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर 

जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर 

जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर 

जळगाव ः महापालिका प्रशासनातर्फे केंद्राच्या "ईईएसएल'च्या माध्यामतून "एस्क्रो' तत्त्वावर शहरात 15 हजार 457 एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे. या कामाला आज प्रभाग क्रमांक पाचमधील 
नेहरू चौकापासून सुरवात झाली. यामुळे दरवर्षी 32.6 लाख युनिट विजेची बचत होणार असून, पालिकेचा 1 कोटी 95 लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. 
महापालिकेतर्फे आज आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरवात झाली. यावेळी महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, सभापती जितेंद्र मराठे, सभापती मंगला चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. शहरात कंपनीतर्फे रस्त्याची रुंदी, खांबांची उंची, लांबी याचा विचार करून आधी सर्वेक्षण केले. त्यानुसार 18, 35, 70 व 110 व्हॅटचे 
15 हजार 457 एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे. 25 कोटीतून शहरातील काही भागात नव्याने खांब 
उभारले जात आहेत. त्यामुळे त्यात भविष्यात आणखी साडेतीन हजार पथदिव्यांची संख्या वाढणार आहे. दोन महिन्यात शहरात एलईडी दिवे लावण्याचे उद्दिष्ट असून, वीजपुरवठा खंडित करून पथदिवे बसवावे लागणार आहेत. या कामासाठी महावितरण कंपनीचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. 

सेंट्रल कंट्रोलिंग मॉनिटरिंग यंत्रणा 
"एनर्जी इफिसियंन्सी सर्व्हिसेस लिमिटेड जॉइंट व्हेन्चर' कंपनी शहरात अस्तित्वात असलेले सर्व पथदिवे काढणार आहे. कंपनीतर्फे शहरातील रस्त्यांचे, पथदिव्यांचे तसेच वीज खांबांचे सर्वेक्षण झाले आहे. तांत्रिक 
बाबी पडताळून योग्य क्षमतेचे पथदिवे बसविले जाणार आहे. तर पथदिवे चालू बंद करण्यासाठी सेंट्रल कंट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टिम असेल. 

सात वर्षांचा करार 
महापालिकेने ईईएसल कंपनीसोबत सात वर्षांचा करार केला आहे. एलईडी बसविल्यानंतर दिवाबत्तीच्या व्यवस्थेसाठी सात वर्षांचा खर्च 12 कोटी 14 लाख होणार आहे. यासाठी प्रोजेक्‍ट "ईईएसल'ला 13 कोटी 89 लाख रुपये अदा करावे लागणार आहेत. एलईडी बसविल्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी सात वर्षांत 5 कोटी 25 रुपये बचत होणार आहेत. 

अशी आहे आकडेवारी... 
सध्या 16 हजार 766 पथदिवे 
एकूण भार 1311 केडब्लू 
प्रस्तावित एलईडी पथदिवे 15 हजार 457 
एलईडीवरील भार 567 केडब्लू 
सध्या 57. 4 लाख युनिट विजेचा वापर 
पथदिव्यांचे वीजबिल 3.44 कोटी रुपये 
एलईडी पथदिव्यांचा 24.8 लाख युनिट 
वीजबिल 1.48 कोटी रुपये खर्च 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com