तापमानाच्या भडक्‍यात जळगाव ४५ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव -  कमाल तापमानात वाढ होत असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. ‘मे हीट’च्या तडाख्यात आग ओकणाऱ्या उष्णतेने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. जळगावचे तापमान आता थेट ४५ अंशांवर नोंदले गेले. 

महिनाभरापासून उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. तापमान काही अंशानेदेखील खाली होण्याचे नाव घेत नाही. जळगावचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले जात असून आठवड्यापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. यातच वाढलेला उकाडा आणि उष्णतेमुळे जळगावकर हैराण झाले आहेत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यात वाढ झाली. कमाल ४४.२ अंश सेल्सिअस आणि किमान २९.२ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ५६ टक्‍के होती.

Web Title: Jalgaon at 45 degrees in temperature