जळगावात ‘मे हीट’ पारा 46 अंशांवर! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

जळगाव - जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर दोन दिवसांपासून वाऱ्यामुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली होती. मात्र, आज जळगावात तापमानाने ४६ अंशांपर्यंत मजल मारली. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक असून, राज्यातही सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उष्माघाताने गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी तीन-चार दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहील, असे सांगितले जात आहे. 
जिल्ह्यात

एप्रिलच्या मध्यंतरापासूनच तापमानात प्रचंड वाढ झाल्याने ‘मे हीट’चा तडाखा जाणवत आहे. यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारा ४४ अंशांवर पोचून वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली होती. वाढलेल्या तापमानामुळे जाणवणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु, दोन दिवसांपासून हवेमुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती. सोमवारी जळगावचे तापमान ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. मात्र यात एका अंशाने घसरण होऊन दोन दिवस तापमान ४३ अंशांवर स्थिर होते.

Web Title: Jalgaon @ 46 temperature