जळगाव, नाशिक केंद्रांतून "मीनू कुठे गेला' प्रथम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नाशिक - चौदाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव आणि नाशिक केंद्रांतून श्री शारदा माध्यमिक विद्यालय, जळगाव या संस्थेचे "मीनू कुठे गेला' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. नाशिकच्या दीपक मंडळ, सांस्कृतिक विभागाच्या "गाढवाचं लग्न' याला द्वितीय, तर प्रबोधिनी विद्यामंदिर संस्थेच्या "शाळा आजोबांची' या नाटाकासाठी अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात आली.

बालनाट्य स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके अशी ः दिग्दर्शन ः प्रथम- सतीश लोटके (राखेतून उडाला मोर), द्वितीय- समीर तडवी (मीनू कुठे गेला), अपंग उत्तेजनार्थ- कांचन इप्पर (शाळा आजोबांची). प्रकाशयोजना ः प्रथम - कृतार्थ कन्सारा (म्या भी शंकर हाय), द्वितीय- योगेश बेलदार (मुलं देवाघरची फुलं). नेपथ्य ः प्रथम- शैलजा लोटके (राखेतून उडाला मोर), द्वितीय- हितेश भामरे (आदिबांच्या बेटावर). रंगभूषा ः प्रथम- पूजा भिरूड (मीनू कुठे गेला), द्वितीय- दीपाली पाटील (चल क्षितिजावर जाऊ). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ः अथर्व कुळकर्णी (गाढवाचं लग्न) व निशा पाटील (भेट). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ः तन्वी काटकर (खेळ), रूचिका बडगुजर (जपूया ही कोवळी मने), प्रतीक्षा झांबरे (चिंगी), मुग्धा घेवरीकर (पिंटी), मानसी देशमुख (परिवर्तन), अजय मगर (मुलं देवाघरची फुलं), हृषीकेश पिंगळे (हेल्मेट), विजय उमक (मीनू कुठं गेला), मार्दव लोटके (राखेतून उडाला मोर), साहिल झावरे (आनंदाचे गोकुळ). बालनाट्य स्पर्धा 5 ते 12 डिसेंबरदरम्यान भय्यासाहेब गंधे सभागृह, जळगाव आणि परशुराम साईखेडकर सभागृह, नाशिक येथे झाल्या. यामध्ये एकूण 46 नाटके सादर करण्यात आली. स्पर्धेसाठी सुरेश पुरी (नांदेड), कपिल पिसे (कोल्हापूर), मधुमती पवार (ठाणे) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आजच्या युगात मुलांना "पाठीवर हात ठेवून लढ' म्हणणाऱ्यांची आवश्‍यकता आहे, हा विषय नाटकाच्या माध्यमातून खूप ताकदीने मांडला. मुलांनीही त्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यासाठी आम्ही आणखी जोरदार प्रयत्न करणार आहे.
- समीर तडवी, जळगाव. दिग्दर्शक, मीनू कुठे गेला.

आम्हाला मिळालेले पारितोषिक हे सांघिक प्रयत्नांचे यश आहे. लहान मुलांमध्ये अशा प्रकारचा वेगळा प्रयोग आम्ही केला आहे. सर्व बालकलाकारांनी झोकून देऊन काम केले. आता राज्यपातळीवर नाशिकचे नाव गाजवण्यासाठी आम्ही जोमाने प्रयत्न करणार आहोत.
- किरण कुलकर्णी, दिग्दर्शक, गाढवाचं लग्न 

Web Title: jalgaon balnatya