Jalgaon Bypass
sakal
जळगाव: राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी ते तरसोद या टप्प्यातील वळण मार्ग (बायपास) अनधिकृतपणे सुरू झाला. या वळणमार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली असली तरी पाळधी- जळगाव फाट्यावर दिशादर्शक फलक नसल्याने शहराकडे येणारी वाहनेही सुसाट ‘बायपास’वर निघून जातात. काही अंतर गेल्यानंतर मात्र वाहनधारकांना मनस्ताप करीत परत यावे लागते, अशी स्थिती आहे.