पाटी ऐवजी "त्यांच्या' नशिबी उकीरडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

आजही गरीबीमुळे अनेक पालक लहानपणापासून मुलांना कामाला लावतात. अशा मुलांना जसे जमेल तसे अक्षर ओळख व्हावी; यासाठी अभेद्य फाउंडेशन काम करीत असल्याचे वैशाली झाल्टे यांनी सांगितले. 

जळगाव : गल्लोगल्ली आणि रस्त्यारस्त्यावर फिरून उकिरडे कोरायचे. त्यातून प्लास्टिक, धातूचे तुकडे शोधायच्या आणि त्या भंगार म्हणून विकायच्या. हा नित्यनियम कचरा गोळा करणाऱ्यांचा असतो. शहरात असे कचरा गोळा करत फिरणारे नरजेस पडत असतात. यात लहान मुले देखील पाहण्यास मिळतात. यामुळे मात्र शिक्षणाच्या प्रवाहापासून मुले दूर जाताना दिसतात. अर्थात या कामामुळे मुलांच्या आयुष्याची माती होत आहे. ज्या वयात त्यांच्या हाती पाटी- पेन्सिल असायला हवी त्याच वयात त्यांच्या नशिबी उकीरड्यावरचे जगणे येत आहे. 
कचरा गोळा करून वाहून नेणे अथवा त्याचे विभाजन करण्याच्या कामात गरीब कुटुंबातील मोठ्यांसह बालकांचाही समावेश असतो. बेरोजगारीमुळे अनेक पालक मुलांना कचरा उचलण्याचे काम लावतात. फेकलेल्या कचऱ्यातून काही वस्तू, धातूचे तुकडे, प्लास्टिक, इलेक्‍ट्रिकचे सामान ही मुले वेचून आणतात. त्यातील निवडक कचरा पुनर्वापरासाठी उपयोगी येत असल्याने तो वेगळा काढण्यात येतो. तो कचरा पुनर्प्रक्रियेसाठी विकला जातो. शहरातील काही निवडक वस्त्यांमध्ये असे अनेक छोटे- मोठे उद्योग सुरू आहेत. 

आरोग्यही धोक्‍यात 
कचरा व्यवस्थापनमध्ये काम करणाऱ्या लहान मुलांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. कचरा निवडताना व त्यातील वस्तूंचे भाग सुटे करताना त्यामधून निघणाऱ्या घातक रसायनांचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. यामध्ये धातूंचे तुकडे वेगळे करताना हाताला जखमा होतात. यासोबतच श्‍वसन व पोटाचे विकार देखील मुलांना होत आहेत. अशात त्वचारोग, दमा यासारखे आजारांची लागण झालेली मुलांमध्ये आढळून येते. शिवाय सतत प्रदूषणात राहत असल्याने त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. काही रोग झाल्यास त्यावर उपचार करण्याची देखील अथक क्षमता नसल्याने त्यांचा आजार वाढतच आहे. 

हेपण वाचा > काम देतो सांगत दिव्यांगाला नेले लॉजवर...

 

Image may contain: 17 people, people smiling, people sitting and child

अभेद्य फाउंडेशन आक्षेचा किरण 
जळगाव जिल्ह्यात 14 वर्षाखालील हजाराहून अधिक बालकामगार आहेत. आदिवासी पट्ट्यात याचे प्रमाण अधिक आहे. अशा मुलांच्या आयुष्याची मात्र माती होत आहे. झोपडपट्टीतील या मुलांसाठी जळगाव शहरात अभेद्य फाउंडेशन काम करीत आहे. फाउंडेशनच्या संचालिका वैशाली झाल्टे या आपल्या घरीच मुलांना शिक्षणाचे धडे देतात. पण प्रश्न उरतो तो गरीबीमुळे शिक्षण न घेणाऱ्या मुलांसाठी आपल्याकडे शिक्षण हक्क कायदा आला. सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण आहे. पण अंमलबजावणीचे काय? आजही गरीबीमुळे अनेक पालक लहानपणापासून मुलांना कामाला लावतात. अशा मुलांना जसे जमेल तसे अक्षर ओळख व्हावी; यासाठी अभेद्य फाउंडेशन काम करीत असल्याचे वैशाली झाल्टे यांनी सांगितले. 

हेपण वाचा > एकतर्फी प्रेमातून हे काय केले विद्यार्थ्यांने... 

Image may contain: 9 people, people smiling

अभेद्यमार्फत ऋषीवर उपचार 
कचरा वेचणाऱ्यांमधील ऋषी बोरसे याला आई नाही. वडील नेहमी दारूच्या नशेत असतात. म्हतारी आजी पण कचरा वेचण्याचे काम करते. त्यामुळे लहान मुलांनाही तेच काम करावे लागते. ऋषी बोरसे हा कित्येक दिवसांपासून आजरी आहे. अभेद्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर उपचार केले. मात्र म्हणतात ना चांगल्या कामाला सुरवात करा; अनेक मदतीचे हात पुढे येतात. ऋषी याला डॉ. सुनील सूर्यवंशी यांच्या रूग्णालयात नेले असता, त्यांनी मुलाची परिस्थिती पाहता तपासणी फी घेतली नाही. मेडिकलमध्येही दहा टक्के सूट दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon child kachara no school addmition abhedya foundation