शहर हिरवेगार करण्याचा संकल्प

शहर हिरवेगार करण्याचा संकल्प

जळगाव - पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होते आणि त्याचा गाजावाजाही खूप होतो; पण जिल्ह्यातील काही संस्था आणि व्यक्ती अशाही आहेत की वृक्षारोपणाचे त्यांचे काम गेली कितीतरी वर्षे एखाद्या व्रताप्रमाणे सुरू आहे. बोदवड येथील वराडे कुटुंबीय हे त्यापैकीच एक व्रतस्थ वृक्षप्रेमी असून त्यांनी संपूर्ण शहर हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे.

अधिकाधिक झाडे लागावीत आणि ती चांगल्या पद्धतीने रुजावीत यासाठी उत्तम रोपे तयार करून देण्याचा ध्यास संजय वराडे आणि प्रमिला वराडे या दांपत्याने घेतला आहे. या ध्यासातून त्यांनी शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण करून १५०० रोपे जगवली आहेत. कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट न पाहाता स्व - खर्चातून आणि श्रमदान करून त्यांनी लावलेल्या रोपांची काळजी घेतली हे उल्लेखनीय. देशी वृक्षांचीच रोपे द्यायची हा वराडे यांचा कटाक्ष असतो. देशी झाडांच्या बिया गोळा करून त्यांच्यापासून रोपे तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. 

जे रोप देऊ ते जगले पाहिजे असेच रोप देण्याचा प्रयत्न मी करतो. त्या रोपांबरोबर मी झाडांचे महत्त्व सांगणारा वृक्षसंदेशही देतो, त्यानेही नागरिकांचे प्रबोधन होते.
-संजय वराडे

तीन वर्षांत परिसर हिरवागार
वराडे दांपत्याने तीन वर्षांपूर्वी गुलमोहर, कडुनिंब, शिसम, करंज, चिंच या झाडांची रोपे बोदवड शहरात विविध ठिकाणी लावली आहेत. उन्हातही रोपांची योग्य निगा राखल्याने तीन वर्षांत १५०० रोपांचे डौलदार झाडांमध्ये झाले आहे. या उपक्रमात वराडे दांपत्याला मुलगा रितेश, मुलगी साक्षी यांनीही मदत केली. या वर्षी संपूर्ण बोदवड शहर हिरवेगार करून निसर्गाच्या ऋणातून उतराई होण्याचा संकल्प वराडे दांपत्याने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com