ठेवी परताव्याचा ऍक्‍शन प्लॅन बारगळला 

ठेवी परताव्याचा ऍक्‍शन प्लॅन बारगळला 

जळगाव ः कर्जवसुलीतून ठेवी परताव्यासाठी सहकार विभागाने जाहीर केलेला कृती कार्यक्रम पूर्णतः बारगळला त्यामुळे आजही जिल्ह्यातील ठेवीदार ठेवींपासून वंचित असल्याचे चित्र आहे. याला तत्कालीन जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांची कुचकामी कार्यप्रणालीच जबाबदार असल्याचा आरोप जनसंग्राम ठेवीदार संघटनेने केला आहे. संस्थाचालक, वसुली अधिकारी, मोठे कर्जदार, मुदतबाह्य ठरलेले अवसायक तसेच प्रशासक यांच्याशी साटेलोटे ठेवल्याने "ठेवीदार उपाशी आणि सहकार खाते तुपाशी', अशी परिस्थिती ओढवल्याचे ठेवीदारांनी सांगितले. 

कालबद्ध कृती कार्यक्रम 
जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी 12 ते 20 डिसेंबर 2016 दरम्यान जिल्ह्यातील ठेवीदारांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. याची दखल म्हणून 20 डिसेंबर 16 ला तत्कालीन सहकार आयुक्तांनी आढावा घेतला होता. या बैठकीत कर्जवसुलीतून ठेवी परत करण्याचा कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यामध्ये विविध 16 मद्यांवर काम करून डिसेंबर 2017 मध्ये जळगाव जिल्हा ठेवीदार मुक्त होईल असे धोरण निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी कृती कार्यक्रमाच्या नावावर "आगळा-वेगळा' कार्यक्रम राबविल्याने ठेवी परत मिळण्याच्या आशेवर पुरते पाणी फिरले आहे. 

वरकमाई धोरणाने खीळ 
जिल्ह्यातील 119 पतसंस्था अडचणीत आल्याने 2 लाख 33 हजार ठेवीदारांचे सुमारे 528 कोटी ठेवींचा परतावा करण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. कृती कार्यक्रमांत कर्जदारांच्या मालमत्ता जप्ती-विक्रीतून ठेवी परत करण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले असताना कलम 101 व 107 नुसार 22 हजार 851 दाखले मिळवून सुमारे 8 हजार 355 प्रकरणांत जप्ती बोजे नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर कलम 100 व नियम 85 प्रमाणे 523 प्रकरणांत जप्त मालमत्ता संस्थेच्या नावावर करण्याची कार्यवाही करण्यात आली. या सर्व प्रकरणात दाखल्यांना मंजुरी देताना' आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय ठेवीदारांमध्ये आहे. 

(क्रमशः ः) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com