जिल्हा बॅंकेच्या वडजी शाखेत ६२ लाख रुपयांचा गैरव्यवहार 

जिल्हा बॅंकेच्या वडजी शाखेत ६२ लाख रुपयांचा गैरव्यवहार 

भडगाव : वडजी (ता. भडगाव) येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत वार्षिक परीक्षण सुरू असताना बँकेचा तत्कालीन व्यवस्थापकानेच ६२ लाखांचा शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून अपहार केल्याचे उघडकीस आले. याबाबत वडजी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचा तत्कालीन व्यवस्थापकाविरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 
अंकित कैलास अग्रवाल चार्टर्ड अकौंटंट (रा. बन्सीलाल नगर औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वडजी (ता. भडगाव) येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान वार्षिक परीक्षण झाले. त्यात लक्षात आले की बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक मनोज प्रभाकर भोसले यांनी वडजी बँक शाखेत जुलै २०१७ ते आॅगष्ट २०१८ दरम्यान शाखेतील कापूस अनुदान, संजय गांधी निराधार अनुदान, बोंडअळी अनुदान, तसेच रीबीटच्या रकमा, आदर लयबेलीटीज, डीफ्रन्स खाते, ओव्हर ङयूस, एफडी, ब्रांच अॅड्जेसमेंट खाते व इतर खाते जमा असलेल्या रकमा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या खात्यात व त्यांचे नातेवाईक व परिचित लोकांच्या खात्यात वर्ग केले. अपहार तयार करण्याच्या दृष्टिकोनातून चुकीचा हिशोब करून शाखेचा व्यवहारात नोंदी घेतलेल्या आहेत. या कालावधीत शाखा व्यवस्थापक मनोज भोसले यांनी काळात एकूण ६२ लाख ५१ रुपयांचा अपहार केलेला आहे. त्यामुळे चार्टड अकाउंटंट अंकित कैलास अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरून मनोज प्रभाकर भोसले (रा. पाचोरा, तत्कालीन शाखा व्यवस्थापक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वडजी, ता. भडगाव) यांच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे करीत आहेत. 

तामसवाडी शाखेत २३ लाख अपहार 
पारोळा : तामसवाडी (ता. पारोळा) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत २३ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तामसवाडी शाखा व्यवस्थापकावर आज अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
याबाबत लेखा परीक्षक अंकीत कैलास अग्रवाल (रा. औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की ता. २८ आॅगस्ट २०१९ ते ३० आॅगस्ट दरम्यान जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तामसवाडी शाखेचे परीक्षण केले असता या शाखेत योगेश प्रकाश पाटील (रा. पारोळा) जानेवारी २०१४ ते सप्टेंबर २०१८ पावेतो शाखा व्यवस्थापक पदावर कामकाज करित होते. परीक्षणा दरम्यान असे निर्देशनास आले की, शाखा व्यवस्थापक योगेश पाटील यांनी कापूस अनुदान, संजय गांधी निराधार, बोंडअळी, रिबीट रकमा, अदर लायबेलिटीज या खाती तसेच शाखेतील काही खातेदारांच्या खात्यात बोगस रकमा नावे टाकून त्या रक्कमा सेन्टल बँकेच्या स्वत:च्या बचत खात्यात ‘एनईएफटी‘ने वर्ग केलेले आहेत. तसेच स्वत:चे पारोळा शाखेतील बचत खाते मोडीफाय करून शालिक पुंजु चौधरी या नावाने बोगस खाते तयार करून त्या खात्यामध्ये काही रकमा वर्ग केलेल्या आहेत.

या रक्कमा काढून अपहार केल्याचे निर्देशनास आलेले आहे. इतर खाती जमा असलेल्या रकमा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शाखा व्यवस्थापक या पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर रित्या शासनाकडून प्राप्त झालेल्या रकमा त्यांनी संबंधित खातेदारांना न देता स्वत:रोखीने व स्वत:च्या खात्यात, नातेवाईक व परिचित लोकांच्या खात्यात वर्ग केलेल्या आहेत. तसा अपहार करण्याचे दुष्टीने चुकीचा हिशोब तयार करून शाखेच्या व्यवहारात नोंदी घेतल्या आहेत. योगेश प्रकाश पाटील यांनी २०१६ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान काळात २२ लाख ७३ हजार ७३४ रुपयांचा अपहार केला म्हणून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर तपास करीत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com