मी आज असतो तर... : एकनाथराव खडसे 

eknathrao khadse
eknathrao khadse

जळगाव : राजकारण्यांविषयीचा विश्वास आता जनतेच्या मनातून उडाला आहे. मात्र, याला कोणत्याही एका पक्षाला जबाबदार धरून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येक पक्ष तेवढाच जबाबदार आहे. आज माझ्याकडे सत्ता नसली; तरी गेल्या महिनाभरापासून अनेक लोक मला म्हणतात, की मी आज असतो तर आजची ही राजकीय परिस्थिती निर्माण झाली नसती. आपल्याबाबत जनतेच्या मनात असलेल्या विश्‍वासाचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे एका "सायंदैनिका'च्या तपपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्‍त केले. 

सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलताना एकनाथराव खडसे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत स्वपक्षासह विरोधकांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, की सध्या कोण कोणासोबत आहे, हे कळायला मार्ग नाही. माझ्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात मी ज्या लोकांवर टीका केली, आज त्यांच्यासोबत राहावे लागत आहे. ज्या कॉंग्रेसने जन्मापासून शिवसेनेवर जातीयवादी म्हणून टीका केली, तीच कॉंग्रेस आज शिवसेनेसोबत गळ्यात गळे घालत आहे, असा चिमटा काढीत "सत्तात्तुरांना भय, न लज्जा' असा जोरदार टोलाही लगावला. 

अजित पवारांना "क्‍लिनचिट' योगायोग 
विदर्भ सिंचन महामंडळातील 70 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील आठ फाइल बंद करून अजित पवार यांना आज "क्‍लिनचिट' देण्यात आली आहे, यावर बोलताना खडसे उपरोधिकपणे म्हणाले, आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आणि अजित पवार यांना नऊ प्रकरणात क्‍लिनचिट मिळाली, हा निव्वळ योगायोग आहे, किंवा हे जाणीवपूर्वक केलेले आहे, हे कळायला मार्ग नाही. माझ्यावर नुसते भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावेळी मी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, आज काय सुरू आहे, हे लोकांना चांगलेच माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com