पैसे नाही भरले; म्हणून गाळे सील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

जळगाव ः महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलापैकी फुले मार्केटमधील थकबाकीचे एक रुपया देखील न भरलेल्या गाळेधारकांचे गाळे सील करण्याची कारवाई आज सुरू केली. सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेचे दोन पथकाद्वारे सुमारे 30 गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली. 

जळगाव ः महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलापैकी फुले मार्केटमधील थकबाकीचे एक रुपया देखील न भरलेल्या गाळेधारकांचे गाळे सील करण्याची कारवाई आज सुरू केली. सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेचे दोन पथकाद्वारे सुमारे 30 गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली. 

महापालिकेच्या मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळ्यांची कराराची मुदत 2012 साली संपली होती. गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित गाळे प्रश्‍नांवर न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने 81 "ब' नूसार फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांना नुकसान भरपाईच्या नोटीस देवून थकबाकी भरण्याची मुदत दिली होती. पंधरा-वीस दिवसापूर्वी पाच गाळे सील केले होते. त्यानंतर अनेक गाळेधारकांनी पैसे भरणा सुरू केला. परंतू एक ही रुपया न भरलेल्या शंभर गाळेधारकांची महापालिकेने यादी तयार करून आज या गाळेधारकांवर कारवाई सुरू केली. महसुलचे उपायुक्त उत्कर्ष गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करून फुले मार्केटमधे सकाळी साडेअकरा वाजता गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली. 

मालासकट दुकाने सील 
फुले मार्केटमधील दुसऱ्या मजल्यावरील गाळे सील करण्याची कारवाई सकाळी महापालिकेच्या महसूल, मार्केट वसुली विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचाऱ्यांचे दोन पथक तयार करून कारवाई सुरू केली. यावेळी दुकानातील मालासकट गाळे सील करण्यात आली. 

कर्मचारी-व्यापाऱ्यांचा शाब्दिक वाद 
गाळेसील करण्याची कारवाई करत असताना व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध करीत पथकातील कर्मचाऱ्यांशी काही ठिकाणी शाब्दिक किरकोळ वाद झाला. कारवाई प्रसंगी पोलिस बंदोबस्त घेतला असल्याने गाळेसील करण्याची कारवाई सुरळीत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon fule market gade seal pending bill