जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी खंडपीठाची नाराजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज (गुरुवार) सुनावणी झाली.

औरंगाबाद : जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज (गुरुवार) सुनावणी झाली. या प्रकरणात जामीन अर्ज दाखल केलेले शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पहिल्या दिवसापासून रुग्णालयात दाखल आहेत, यावर खंडपीठाने प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.

या सुनावणीदरम्यान डायबेटीज आणि बीपी या आजाराच्या नावाखाली आरोपी हॉस्पिटलमध्ये कसे काय राहू शकतात, अशी विचारणा करत आरोपींना दाखल करण्यात आलेल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (धुळे) डॉक्टरांना नोटीस बजावली. तसेच हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले. जोपर्यंत आरोपी कारागृहात जाणार नाहीत. तोपर्यंत त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेणार नसल्याचा पवित्रा खंडपीठाने घेतला. दरम्यान सदर 5 आरोपींच्या वतीने जामीन अर्ज मागे घेण्यात आला.

डावीकडून उजवीकडे झुकलेल्या नागनाथ अण्णांच्या वारसदारांमध्ये फूट?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalgaon Gharkul Scam Courts Disappointment