जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

जळगाव : संपूर्ण राज्यात गाजलेला जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल आज अर्थात 27 जूनला धुळे जिल्हा न्यायालयात दिला जाणार होता. मात्र न्यायाधीश डॉ सृष्टी निळकंठ ह्या रजेवर असल्याने कामकाज होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल कधी लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. 

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी 3 फेब्रुवारी 2006 ला जळगाव शहर पोलिस ठाण्यात सुमारे 48 कोटींच्या गैरव्यवहाराचा 93 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार 57 पैकी 53 आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आले आहे. यात 2 माजी मंत्र्यांसह काही माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 57 पैकी 8 आरोपींचा मृत्यू झाला आहे. जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल धुळे जिल्हा सत्र न्यायालयात जाहीर केला जाणार आहे.

जळगाव घरकुल घोटाळ्याचा आज अर्थात 27 जूनला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.  मात्र न्यायाधीश डॉ सृष्टी निळकंठ ह्या रजेवर असल्याने हा निकाल आज देखील जाहीर होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या कामकाजावेळी देखील डॉ सृष्टी निळकंठ ह्या रजेवर असल्याने न्या एस आर उगले यांच्यापुढे कामकाज चालले होते. संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागून असून हा निकाल कधी लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalgaon Gharkul scam decision on stay