जळगाव जिल्हा परिषदेवर पुन्हा महिलाराज! 

nanda patil rajni chavan
nanda patil rajni chavan

जळगाव ः जिल्हा परिषद अध्यक्षांची आरक्षणे आज राज्य सरकारने जाहीर केली असून, यात जळगाव जिल्हा परिषदेवर सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर महिलाराज पाहण्यास मिळणार आहे. आरक्षण सोडतीमुळे भाजपकडून तीन महिला सदस्यांची नावे आघाडीवर आहेत. तर महाशिवआघाडी झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन नावे पुढे येत आहेत. 
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीची डिसेंबरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. यासाठीचे आरक्षण आज निघाले असून, निवडीसाठीच्या हालचाली सुरू होणार आहे. पंचवार्षिकमधील अडीच वर्षाचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये पुर्ण झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने मुदतवाढ मिळाली होती. पहिले अडीच वर्षासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण देखील ओबीसी महिला राखीव असल्याने ही संधी उज्वला पाटील यांना मिळाली होती. तर पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला राखीव करण्यात आल्याने आता भाजपकडून पुरूष सदस्यगतिमान झाल्या आहेत. अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या पदासाठी भाजपच्या पाल- केऱ्हाळा गटातील नंदा अमोल पाटील व फत्तेपुर- तोंडापूर गटातील सदस्या व महिला बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय, माधुरी अत्तरदे आणि विद्या खोडपे यांचे नाव देखील घेतले जात आहे. 

राष्ट्रवादी- सेनाही प्रयत्नशील 
जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण बदलण्याचे बोलले जात आहे. राज्यात महाशिवआघाडी होण्याची शक्‍यता असताना जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसच्या सहकार्याने सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. भाजपतील नाराज सदस्यांना निवडणुक प्रक्रियेतून दूर ठेवून महाशिवआघाडी जि.प. सत्तेत येवू शकते. असे झाल्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या कळमसरे- जळोद गटातील सदस्या जयश्री अनिल पाटील व चहार्डी- बुधगाव गटातील प्रा. डॉ. निलम पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिवसेनेकडून रेखा राजपूत आणि कल्पना संजय पाटील यांचे नाव पुढे करण्यात येण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com