अमळनेर साहित्य संस्कृतीचे पावनतीर्थ - प्रा. मिलिंद जोशी

योगेश महाजन
रविवार, 24 सप्टेंबर 2017

अमळनेर : जेथे पावनतिर्थ आहे तेथून नमस्कार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अमळनेर हे साहित्य संस्कृतीचे पावनतिर्थच आहे. या नगरीत साने गुरुजींसारखे महापुरूष वास्तव्यास होते. म्हणूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेची येथे शाखा सुरू झाली असून, याचा आपणास मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी आज येथे केले. 

अन्नपूर्णा मंगल कार्यालयात आज सकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या झालेल्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे अध्यक्षस्थानी होते. साहित्य परिषदेच्या कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार, साम दूरचित्रवाहिनीचे वरिष्ठ निर्माता दुर्गेश सोनार, प्रा. वि. दा. पिंगळे प्रमुख पाहुणे होते. 
श्री. जोशी पुढे म्हणाले, की साहित्य परिषदा शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात शेतातही अशा परिषदा आपण घेत आहोत. साहित्य क्षेत्रात अधिकाधिक तरुणांचाही सहभाग महत्वाचा आहे. 

दुर्गेश सोनार म्हणाले, की अमळनेरनगरीस साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. तरुण पिढीने वाचन करणे महत्वाचे आहे. परिवारातील ज्येष्ठांनी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. यावेळी प्रा. पिंगळे, सुनेताराजे पवार यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

Web Title: jalgaon marathi news amalner sahitya parishad