मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; 6 गाड्या जप्त

दीपक  कच्छवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सध्यातरी  सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजुन काही मोटरसायकली निघण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे. यात आणखी काही संशयितांची चौकशी केली जाणार आहे.
- दिलीप शिरसाठ, सहायक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील पोलिसांनी दोन दिवसापुर्वीच शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. हि घटना ताजी असताना आज पोलिसांनी सायगाव (ता.चाळीसगाव) येथुन सहा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करून आरोपींना अटक केली आहे.

सायगाव (ता.चाळीसगाव) येथील भागात गेल्या अनेक दिवसापासून चोरीच्या मोटरसायकली कमी किमतीत विकल्या जात होत्या. यासंदर्भात  मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांना (दि. 9) रोजी शनिवारी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार शिरसाठ यांनी पोलिस हवालदार छबुलाल नागरे व  गोरख चकोर यांना सायगाव भागात माहीती मिळविण्यास सांगितली. पोलीस कॉन्स्टेबल गोरख चकोर यांनी सायगावच्या कैलास अशोक महाजन याला विश्वासात घेऊन माहीती काढली. त्यांने महाजन ने कबुली दिली की मी मोटार सायकल कमी किमतीत विकतो.  ही खात्री झाल्यावर संशयीत  कैलास महाजन याला पोलिसांनी अटक केली.

खाक्या दाखवताच बोलू लागला...
सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी संशयित कैलास महाजन याला खाक्या दाखविताच तो बोलता झाला. त्याचे इतर साथीदार अर्थात  त्याला गाड्या आणुन देणारे आत्माराम पितांबर महाजन व धनराज अमृत महाजन दोन्ही रा.नवेगाव भिलाटी तामसवाडी (ता. पारोळा) येथील असल्याचे माहिती कैलास महाजन याने  पोलिसांना दिली. या दोघांना मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलीस पथकाने नवेगाव भिलाटी तामसवाडी जावुन दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.  हिरोहोंडा कंपनीच्या पाच तर एक पॅशन प्रो अशा सहा चोरीच्या मोटरसायकली मेहुणबारे पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 

चोरी करणारे वेगळे, विकणारा वेगळा...
आत्माराम महाजन व धनराज महाजन या दोघांनी धुळे जिल्हय़ातून  पारोळा, तामसवाडी, ककरा भिलाली, या जवळपासच्या  भागातून मोटरसायकली चोरून लंपास केल्या आहेत. या दोघा भामटय़ांनी या गाड्या चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे राहात असलेल्या नातेवाईक कैलास महाजन याच्या मार्फत विकल्या आहेत. या सहा गाड्यांची अंदाजित किंमत 1 लाख 80 हजार रुपये असून हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  ही  कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक नजिम शेख, छबुलाल नागरे शैलेश माळी , गोरख चकोर आदींनी टोळीचा छडा लावला.

दोघांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय
आत्माराम महाजन व धनराज महाजन या दोघांची हलाखीची परिस्थिती आहे. हे दोघे हातविक्री द्वारे भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु त्यांनी चोरलेल्या मोटरसायकलीत अजुन काही तरूण सहभागी आहेत का? याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास 

Web Title: jalgaon marathi news chalisgaon bike thieves caught