बिबट्याकडून पुन्हा कुत्रा, मेढींचा फडशा

दीपक कच्छवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

वरखेडे परिसरात भीतीचे वातावरण वन विभागातर्फे तीन ठिकाणी लावले पिंजरे

मेहुणबार (ता. चाळीसगाव) : वरखेडे  शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात काल झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर सर्व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीही बिबट्याने आज (शुक्रवार) पुन्हा पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कुत्रा व मेंढीचा फडशा पाडला. त्यामुळे पुन्हा बिबट्याची या भागात दहशत निर्माण झाली आहे.

वरखेडे शिवारात काल दिपाली जगताप या  बिबट्याच्या हल्यात ठार झाल्याची घटना ताजी असतानाच. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास वरखेडे मेहुणबारे रसत्यावरील वामन हारसिंग पवार यांच्या कपाशीच्या  शेतात सुका दिनकर भिल यांचा मेढींचा वाडा बसलेला होता. या वाड्यावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने  धुमाकुळ घालत त्यांचा एक कुत्रा व मेढींचा फडशा पाडला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दुपारी दर्शन
आज दुपारी पुन्हा बिबट्याने पळासरे भागात आनंदा गवारे यांच्या शेतात त्यांचा मुलगा संदिप गवारे यांच्यासह पंधरा ते वीस ग्रामस्थांनी तेथे बिबट्या पाहिला. यामुळे त्या भागातील सर्व मजुर दुपारीच घराकडे परतले. आज परिसरात दिवसभर काल झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची चर्चा होती. दरम्यान पिलखोड (ता.चाळीसगाव) परिसरात पुन्हा आज दुपारी एक वाजेच्या सुमारास  बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभाग मात्र उशिराने घटनास्थळी दाखल झाले. परंतु वन विभागाने घटनेचे गांभीर्य घेतले नसल्याने ग्रामस्थानी वनविभागाविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

वरखेडे परिसरात तीन ठिकाणी लावले पिंजरे
काल झालेल्या घटनेनंतर वनविभागाने पुन्हा कांगावा करीत तिन ठीकाणी पिंजरा लावला आहे.येथील भागातील वरखेडे- दरेगाव रसत्यालगत कालच्या घटनेच्या जागेवर तुकाराम जगताप यांच्या शेतात लावण्यात आला.त्यानंतर याच शेतापासुन पुढे नाल्याजवळील भगवान जामसिंग पाटील यांच्या शेतात लावण्यात आला.तर तिसरा पिंजरा पळासरे रसत्यालगत असलेल्या अनंदा गवारे यांच्या शेतात लावण्यात आला आहे.त्यामुळे आज दिवसभर वनविभागाचे वनपाल, वनरक्षक ,वन मजुर दिवसभर पिंजरा लावण्याच्या

अंधारात उडवले ड्रोन कॅमेरे...
वन विभागाने जळगावचे वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांच्यासह ड्रोन कॅमेरे पाचारण केले आहेत. आज सायंकाळी सातला वरखेडे मेहुणबारे रसत्यालगत असलेल्या सोमसिंग हरसिंग पवार यांच्या शेतात ड्रोन कॅमेरे उडवले.मात्र, अंधार झाल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे संपूर्ण दिवस सोडून सायंकाळीच वन विभागाला  हे शहाणपण कसे सुचले असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. जी कारवाई करायची असेल ती दिवसा करण्याऐवजी रात्रीच्या अंधारात उशिराने देखावे करून वन विभाग काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे,असे ग्रामस्थांनी 'सकाळशी शी बोलताना सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: jalgaon marathi news chalisgaon leopard kills dog, goat