चाळीसगाव : मन्याड धरण 32 टक्के भरले

शिवनंदन बाविस्कर
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

धरणात एकूण 941 दशलक्ष घनफुट साठा निर्माण झाला असून आज सकाळी 32 टक्के भरले.

पिलखोड (ता. चाळीसगाव), ता. 25 : पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्यामुळे आवक मंदावली असून धरण आज सकाळी 32 टक्के भरले. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

गतवर्षाप्रमाणे यंदाही मन्याड धरण पावसाळा संपण्याच्या शेवटीच भरू लागले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने माणिकपुंज धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे त्याचे पाणी मन्याडमध्ये दाखल झाल्याने धरणाने पाच ते सहा दिवसांतच पाणी पातळीची तिशी ओलांडली. धरणात एकूण 941 दशलक्ष घनफुट साठा निर्माण झाला असून आज सकाळी 32 टक्के भरले. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. 

दरम्यान, धरण भरण्याच्या दृष्टीने एक ते दोन दमदार पावसाची गरज आहे. धरण 32 टक्के झाल्याने लवकरच शंभर टक्के भरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे धरण यंदाही ओव्हरफ्लो होण्याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

पिण्याचे आरक्षण पूर्ण...
धरणात सध्या 32 टक्के साठा आहे. या बरोबरच पिण्याचे आरक्षणही पूर्ण झाले आहे. मात्र, सिंचनासाठी अजून पाण्याची आवश्यकता असल्याचे हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला सांगितले.

Web Title: jalgaon marathi news chalisgaon manyad dam storage