मन्याड धरणातील साठा 38 टक्क्यांवर स्थिरावला

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

धरणात कालपर्यंत अत्यल्प आवक सुरु होती. मात्र आज आवकही बंद झाली असून पाणीसाठा 38 टक्क्यांवर स्थिरावला आहे.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : पावसाने उघडीप घेतल्यामुळे मन्याड धरणाचा पाणीसाठा 38 टक्क्यांवर स्थिरावला आहे. सध्या धरणात पाण्याची आवकही बंद झाली आहे. त्यामुळे धरण परतीच्या पावसाने तरी शंभर टक्के भरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे मन्याड धरण 3 ऑक्टोंबरला शंभर टक्के भरुन 'ओव्हरफ्लो' झाले होते. मात्र, यंदा धरण क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात पर्जन्यमान झाले नसल्याने धरण भरु शकले नाही. सध्या धरणात एकुण 1 हजार 26 दशलक्ष घनफुट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरण 38 टक्के एवढे भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने आवकही कमी झाली आहे. धरणात कालपर्यंत अत्यल्प आवक सुरु होती. मात्र आज आवकही बंद झाली असून पाणीसाठा 38 टक्क्यांवर स्थिरावला आहे. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. दरम्यान धरण भरण्यासाठी एका दमदार परतीच्या पावसाची प्रतिक्षा आहे. 

सिंचनासाठी आवर्तन शक्य?
सध्या धरणात 38 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे एवढ्या साठ्यात पिण्याचे आरक्षण पूर्ण झाले आहे. समजा परतीच्या पावसाने धरणाचा पाणीसाठा वाढलाच नाही. तर या पाण्यात सिंचनासाठी आवर्तन द्यायचे ठरले तर एक आवर्तन मिळु शकते, अशी शक्यता आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: jalgaon marathi news chalisgaon manyad dam water level