अरे वा... भुसावळातून धावणार पाच तेजस गाड्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

देशभरातील शंभर रेल्वे मार्गावरून दीडशे खाजगी तेजस ट्रेन धावणार असून, त्यातील पाच गाड्या या भुसावळ विभागातून धावणार असल्याची माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी येथे दिली. 

भुसावळ : देशभरातील शंभर रेल्वे मार्गावरून दीडशे खाजगी तेजस ट्रेन धावणार असून, त्यातील पाच गाड्या या भुसावळ विभागातून धावणार असल्याची माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी येथे दिली. 

डीआरएम कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा, वरिष्ठ अभियंता राजेश चिखले, मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. अरूणकुमार उपस्थित होते. 
डीआरएम गुप्ता म्हणाले की, वर्षभरात पॅसेंजर ट्रेन बंद करण्यात येणार असून त्याऐवजी जलदगतीच्या मेमू ट्रेन धावणार आहेत. शिवाय भुसावळात मंजूर असलेला मेमू दुरुस्तीचा कारखाना सप्टेंबर पर्यंत कार्यान्वित 
होईल. असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तेजस ट्रेनमध्ये मुंबई-नागपूर, मुंबई-बनारस, पुणे-पटना, नागपूर-पुणे, सुरत-बनारस या गाड्यांचा समावेश असून, वेस्टर्न झोनमधून मुंबई-अहमदाबाद ट्रेन धावणार आहे. तसेच जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनसाठी एकूण 65 कोटी मंजूर झाले असून, एप्रिल महिन्यापर्यंत तिसऱ्या लाइनचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे सुरतकडून येणाऱ्या गाड्यांना विलंब होणार नसून, वाहतुकीची समस्याही सुटणार आहे. भविष्यात गाड्यांचा वेग प्रति तासी 130 किलोमीटर व नंतर 160 किलोमीटर केला जाईल त्यामुळे वेळेची बचत होईल, असे सांगितले. 
 

हेपण पहा : तो...आवाज सुपरसॉनिक सुखोईचा !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Five Tejas trains run through the Bhusawal divhijan