मुदत संपलेल्या गाळ्यांचे  फेरमूल्यांकन होणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुदत संपलेल्या गाळ्यांचे 
फेरमूल्यांकन होणार 

मुदत संपलेल्या गाळ्यांचे 
फेरमूल्यांकन होणार 

जळगावः महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकीत गाळेभाड्यावर महापालिकेच्या ठरावानुसार पाच दंड लावण्यात आला होता. हा पाचपट दंड रद्द करून एक पट व पुन्हा फेरमूल्यांकन करण्याचा ठराव झाला होता. त्यात आता गाळेधारकांनी तीन मुद्यांवर घेतलेल्या हरकतीवरून राज्य शासनाने फेरमूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन फेरमूल्यांकन करून नवीन बिले तयार करणार आहे. 
महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलांतील 2 हजार 387 गाळेधारकांची मुदत 2012 मध्ये संपलेली 
आहे. या गाळेधारकांकडे गेल्या सात वर्षांपासून 318 कोटी गाळेभाडे थकले आहे. त्यापैकी 22 कोटी वसूल झाले असून, उर्वरित 296 कोटी रुपये थकलेले आहेत. राज्य शासनाने मागविलेल्या हरकतींवर गाळेधारकांनी तीन मुद्यांवर हरकती घेतल्या असून, त्यात लावलेल्या बिलात इमारतीचा घसारा वगळलेला नाही. तो कमी करावा, पहिल्या मजल्यापासून सर्व मजल्यांना एकसारखी दर आकारणी, तसेच संकुलाचा दर्शनी भाग ते शेवटचा भागाला एकसारखे रेडीरेकनर दर लावल्याबाबत हरकती घेतल्या होत्या. याबाबत महापालिकेने राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार आता शासनाने मार्गदर्शन आले असून, फेरमूल्यांकन करण्याचा सूचना दिल्या आहेत. 

फेरमूल्यांकनाने 30 टक्के रक्कम कमी होईल 
मुदत संपलेल्या संकुलातीत 2 हजार 387 गाळेधारकांकडे थकीत बिलापोटी 296 कोटी रक्कम थकलेली आहे. फेरमूल्यांकन झाल्यास यात घसाराची सुमारे 30 टक्के रक्कम कमी होणार आहे. त्यामुळे सव्वादोनशे कोटींवर थकबाची रक्कम होईल. 

भाडे भरण्याकडे गाळेधारकांची पाठ 
गाळेधारकांनी थकीत गाळेभाडे दहा दिवसांत भरावे, असे महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले होते. त्याला आठ दिवस झाले असून, एकाही गाळेधारकाने पैसे भरलेले नाही. त्यामुळे गाळेधारकांकडे केवळ दोन-तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी दिलेल्या मुदतीत थकीत गाळेभाडे भरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news gal fermulyakan